Breaking
News

अवघ्या काही तासात होणार चेक क्लिअर; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची महत्त्वाची घोषणा

रिझर्व बँकेने आज जाहीर केलेल्या पतधोरण आढावा बैठकीत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक आणि देशातील सर्व बँका आता चेक क्लिअरिंगसाठी नवी पद्धत स्वीकारणार आहेत. या पद्धतीनुसार तुम्ही दिलेला चेक आता पुढील काही तासात क्लिअर होऊन तुम्ही ज्या व्यक्तीला चेक दिला त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतील.

सध्याच्या परिस्थितीत आपण चेक दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किमान दोन दिवस पैसे जमा होण्यासाठी वाट पाहावी लागते. तंत्रज्ञानाच्या आधारे आता चेक क्लिअरिंग अवघ्या काही तासात करता येणे शक्य आहे. त्यामुळे ही नवी पद्धत अवलंबत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण आढाव्याच्या शेवटी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे पुढील महिनाभरात हे नवं धोरण लागू केली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र बँकांच्या कामाच्या तासानंतर चेक दिल्यास कधीपर्यंत पैसे खात्यात जमा होणार, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.