EPFO Interest Rate: PF वर यावर्षी किती मिळणार व्याज? केंद्र सरकारनं घेतला निर्णय

EPFO Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

EPFO Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या आर्थिक वर्षात (२०२४-२५) भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात जमा केलेल्या रकमेवर 8.25 टक्के व्याज मिळेल, याला सरकारने मंजुरी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मागील वर्षाप्रमाणेच व्याजदर कायम

हा सलग दुसरा वर्ष आहे, जेव्हा PF वरील व्याजदर 8.25 टक्के ठेवण्यात आला आहे. यापूर्वी, 2023-24 या आर्थिक वर्षासाठीही हाच व्याजदर होता. EPFO ने 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि तो अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे.

या निर्णयामुळे देशभरातील ७ कोटींहून अधिक EPFO ​​सदस्यांना फायदा होणार आहे.

दरम्यान, ईपीएफओने मार्चमध्ये 14.58 लाख नवीन सदस्य जोडले, आणि मार्च 2024 च्या तुलनेत निव्वळ वेतनवाढीत 1.15 टक्के वाढ नोंदवली. पीएफ संघटनेने मार्च 2025 मध्ये सुमारे 7.54 लाख नवीन ग्राहकांची नोंदणी केली.  फेब्रुवारीच्या तुलनेत 2.03 टक्के वाढ आणि मार्च 2024 च्या तुलनेत वार्षिक आधारावर 0.98 टक्के वाढ झाली आहे.

नवीन ग्राहकांच्या वाढीचे श्रेय वाढत्या रोजगार संधी, कर्मचारी लाभांबद्दल वाढती जागरूकता आणि ईपीएफओच्या यशस्वी आऊटरीच कार्यक्रमांना आहे. असं श्रम मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. 18 ते 25 वयोगटातील 4.45 लाख नवीन ग्राहक जोडले गेले आहेत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.   
 

Advertisement
Topics mentioned in this article