Fixed Deposit: बायको नाही तर आईच्या नावावर करा FD, भक्कम व्याजासह मिळतील अनेक फायदे

Fixed Deposit : तुम्हाला FD वर जास्ट रिटर्न हवे असतील तर पत्नीपेक्षा आईच्या नावावर फिक्स डिपॉझिट करणे हा चांगला मार्ग आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Fixed Deposit: फिक्स डिपॉझिट (FD) हा गुंतवणूक करण्याचा नेहमीचा मार्ग आहे. या गुंतवणुकीमधून एक निश्चित रक्कम परत मिळते. त्याचबरोबर तुमची रक्कमही सुरक्षित राहते. पण, तुम्हाला फिक्स डिपॉझिटमध्ये जास्त रिटर्न हवं असेल तर त्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेकजण कर वाचवण्यासाठी पत्नीच्या नावावर FD करतात. पण, तुम्हाला FD वर जास्ट रिटर्न हवे असतील तर पत्नीपेक्षा आईच्या नावावर फिक्स डिपॉझिट करणे हा चांगला मार्ग आहे. 

आईच्या नावावर FD केले तर तुम्हाला जास्त व्याजासह अन्य फायदे देखील मिळतात. आईच्या नावावर  FD करण्याचे काय फायदे आहेत हे पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

जास्त व्याज

तुम्ही पत्नीच्या नावावर FD केलं तर तुमचा टॅक्स वाचेल. पण, त्यावर अतिरिक्त व्याज मिळणार नाही. तुमच्या नावावर FD केल्यावर मिळालं असतं तितकंच व्याज तुम्हाला पत्नीच्या नावानं फिक्स डिपॉझिट केल्यानंतर मिळेल. पण, तुम्ही आईच्य नावानं गुंतवणूक केली आणि आईचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्या FD वर 0.50 टक्के जास्त रिटर्न मिळू शकतो.

तुमच्या आईचं वय 80 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 0.75 ते 0.80 टक्के व्याज मिळू शकते. तुम्ही जास्त रिटर्न मिळवण्यासाठी आई किंवा वडिलांच्या नावानं गुंतवणूक करु शकता. ज्येष्ठ नागरिकांना FD मध्ये जास्त रिटर्न मिळतात.  

Advertisement

( नक्की वाचा : Property Law : मुलाच्या संपत्तीवर आई-वडिलांचा अधिकार असतो? काय सांगतो कायदा? )
 

TDS मध्ये फायदा

तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये केलेली रकमेवर TDS (Tax Deducted at Source) कट होतो. एका आर्थिक वर्षात FD वर मिळणारे व्याज 40,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाा 10 टक्के TDS द्यावा लागेल. पण, ज्येष्ठ नागरिकांना ही मर्यादा 50,000 रुपये आहे. 

कर दायित्वही (Tax Liability) कमी होऊ शकते 

तुम्ही तुमच्या नावावर FD मध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यामधून होणारी कमाई तुमच्या उत्पन्नाशी जोडली जाते. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये अतिरिक्त कर भरावा लागू शकतो. तुम्ही जर तुमच्या आईच्या नावावर गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्त रिटर्न तर मिळेलच त्याचबरोबर तुमच्या टॅक्समध्येही बचत होते. 

Advertisement

तुमची आई ज्येष्ठ नागरिक आहे आणि तिला अन्य कोणतेही उत्पन्न नसेल तिचा समावेश लोअर टॅक्स ब्रॅकेटमध्ये होतो. त्यामुळे आईच्या नावावर FD केलं तर तुम्हाला सर्व फायदे मिळतात. अनेक कुटुंबात महिला या गृहिणी असल्यानं लोअर टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही कर दायित्व (Tax Liability) नसते. 
 

Topics mentioned in this article