फ्लिपकार्टवर iPhone15 ची किंमत पाहून तुम्हाला धक्काच बसेल

ई-कॉमर्स वेबसाईटवर सेलची घोषणा होताच मोबाईलप्रेमी आयफोनच्या किंमती काय असतील याकडे डोळे लावून बसलेले असतात.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

सणासुदीला सुरुवात झाली असून यासोबतच ई-कॉमर्स वेबसाइटवर डिस्काउंट ऑफर्स सुरू झाल्या आहेत. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या बड्या कंपन्यांनी या वर्षातील सर्वात मोठा सेल जाहीर केला आहे. स्मार्टफोन्सपासून ते मोठ्या होम अप्लायन्सेसपर्यंत दोन्ही कंपन्यांनी बंपर डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत. तुमच्या आवडत्या वस्तू कमी दरात खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचा दावा केला जात आहे.

ई-कॉमर्स वेबसाईटवर सेलची घोषणा होताच मोबाईलप्रेमी आयफोनच्या किंमती काय असतील याकडे डोळे लावून बसलेले असतात. आपण iPhone 15 ची किंमत बघणारच आहोत मात्र त्याआधी आणखी एका जबरदस्त फोनबद्दल आणि त्याच्या किंमतीबद्दल जाणून घेऊया. हा फोन आहे Google Pixel. Flipkart च्या बिग बिलियन डेज सेलला 27 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

या सेलमध्ये गुगल पिक्सेल मोबाईलवर एक जबरदस्त सवलत देण्यात येणार आहे. तुम्ही फ्लिपकार्ट प्लस सदस्य असाल तर तुम्हाला 26 सप्टेंबरपासूनच खरेदी सुरु करता येईल. Google Pixel 7 Pro ची फ्लिपकार्टवर मूळ किंमत 84,999 रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र गुगलने यावर 40 हजार रुपयांची सवलत जाहीर केली आहे. ग्राहकांना हा फोन जवळपास 47% कमी किंमतीमध्ये मिळणार आहे. या सवलतीनंतर ग्राहकांना हा फोन 44999 रुपयांना मिळेल.

Google Pixel 7 Pro वर दणदणीत सवलत दिली जात असून फ्लॅट डिस्काउंटसोबतच बँक ऑफरही दिली जात आहे. HDFC बँक पिक्सेल क्रेडिट कार्डने खरेदी केली तर तुम्हाला या फोनवर 250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. जर तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्टवर 'बिग बिलियन डे' नावाचा सेल सुरू झाला आहे. यामध्ये विविध गोष्टी स्वस्त दरांत मिळतील असा दावा करण्यात येत आहे. या सेलकडे लोकांचे लक्ष हे खासकरून आयफोनसाठी लागलेले असते. iphone15 ची किंमत जाहीर करण्यात आली असून ती पाहून ग्राहकांना डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये.

iPhone 15 ची किंमत या सेलमध्ये 54999 रुपये असून त्यावर 6 हजार रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. यामुळे ही किंमत 48,999 इतकी होणार आहे. म्हणजेच तुम्हाला iPhone 15 हा फक्त 48,999 रुपयांना मिळू शकणार आहे.