चांदीच्या दरात (Gold And Silver Price on 27 January 2026) मंगळवारी पुन्हा एकदा मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच 26 जानेवारीच्या तुलनेत मंगळवारी चांदीच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किंचित घट नोंदवण्यात आली आहे.
चांदीचे दर सुसाट वाढले
26 जानेवारीच्या तुलनेत आज चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. काल शुद्ध चांदीचा (Bullion) विक्री दर 3,43,400 रुपये प्रति किलो होता, तो आज वाढून 3,65,100 रुपये झाला आहे. म्हणजेच अवघ्या 24 तासांत चांदीच्या दरात 21,700 रुपयांची वाढ झाली आहे. दागिन्यांच्या चांदीचा दरही 3,40,000 रुपयांवरून 3,61,500 रुपये इतका झाला आहे.
सोन्यानं किंचित स्वस्त झालं
चांदीच्या दरात भडका उडालेला असताना सोन्याच्या दरात मात्र 300 रुपयांची घट झाली आहे. 26 जानेवारी रोजी 24 कॅरेट (Standard 99.5) सोन्याचा विक्री दर 1,60,600 रुपये होता, जो आज 27 जानेवारीला 1,60,300 रुपयांवर आला आहे.
सोनं किती स्वस्त झालं?
सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
- 24 कॅरेट (Standard): 1,60,300 रुपये (काल 1,60,600 - 300 रुपयांनी स्वस्त)
- 22 कॅरेट (916 Hallmarked): 1,49,100 रुपये (काल 1,49,400 - 300 रुपयांनी स्वस्त)
- 18 कॅरेट: 1,23,400 रुपये (काल 1,23,700)
- 14 कॅरेट: 97,000 रुपये (काल 97,200)
चांदी किती रुपयांनी महागली?
शुद्ध चांदी- (Bullion/Coins): 3,65,100 रुपये (काल 3,43,400) 21,700 रुपयांनी महाग
दागिन्यांची चांदी- (Jewellery): 3,61,500 रुपये (काल 3,40,000) 21,500 रुपयांनी महाग
नागपूर सराफा असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, वर दिलेले दर हे शिफारसीत दर आहेत. या दरांव्यतिरिक्त जीएसटी (GST), हॉलमार्क चार्जेस आणि किमान 13 टक्क्यांपासून सुरू होणारे मेकिंग चार्जेस (घडणावळ) ग्राहकांना स्वतंत्रपणे द्यावे लागतील.