Gold Rate: सोन्याला उच्चांकी झळाळी! भाव पुन्हा गगनाला भिडले; जाणून घ्या आजचे दर...

सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आजही सोने- चांदीच्या दरात मोठे वाढ झाली असून आज सोन्याचा दर 87 हजार प्रति 10 ग्रेम इतका झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

जानेवारी महिना उलटल्यानंतर एकीकडे लग्न सराईची लगबग सुरु होत असतानाच सोन्याचा भाव मात्र चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. देशाचा अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी सोन्याने तब्बल 86,  हजारांचा विक्रमी आकडा गाठला होता. तेव्हापासून सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आजही सोने- चांदीच्या दरात मोठे वाढ झाली असून आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 84 हजार 670 ग्रेम इतका झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2025 ला सुरुवात झाल्यापासून सराफ बाजार तेजीत असून सोने- चांदीचे दर नवनवे विक्रम करताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात मोठी वाढत असून गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांक पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आज चांदी बाजारही तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. जीएसटी जोडल्यानंतर चांदीनेही प्रति किलो 98 हजार रुपयांचा आकडा ओलांडला आहे, तर सोन्याने प्रति 10 ग्रॅम 84 हजार 670 रुपयांची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी रात्रीच्या तुलनेत गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचे दर 800 रुपयांनी वाढले आहेत. हा दर जीएसटीशिवायचा दर आहे.

नक्की वाचा - Shirish More : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, संघाचे प्रचारक, हभप शिरीष मोरेंनी गळफास घेत संपवलं जीवन  

दरम्यान,  या किमती वाढल्यामुळे सामान्य लोकांना सोने आणि चांदी खरेदी करणे कठीण झाले आहे. सराफा बाजाराची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. ग्राहकांची ये-जा कमी झाली आहे. येणारे लोकही केवळ मोलभाव करत आहेत. याचा थेट परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे. दुकानदारांची विक्री जवळजवळ थांबली असून दिवसभरात मोजकेच लोक खरेदीसाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

Advertisement