आंतरराष्ट्रीय मार्केटमधील सातत्यानं सुरु असलेल्या तेजीचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावरही झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एक तोळे सोन्याची किंमत 75 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
वाढता वाढता वाढे...
2024 हे वर्ष सोनं खरेदी करण्याती इच्छा असलेल्या ग्राहकांचा खिसा रिकामा करणारं ठरलं आहे. या साडेतीन महिन्यात सोन्याचा दराची किंमतीनं नवा उच्चांक गाठलाय. 1 जानेवारीला सोन्याचा दर GST वगळता 63, 302 रुपये इतका होता. तो आता 72967 (GST शिवाय) इतका झालं. तर चांदीचा दर 73758 (GST वगळून) होता त्यामध्येही 10 हजारांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
सोन्याचा दर 75 हजारांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज तज्ज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. तो आता खरा ठरला आहे. जगभरातील गुंतवणुकदारांना त्यांनी पत्कारलेली जोखीम कव्हर करायची असल्यानं सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
पेट्रोल, गॅस नंतर आता फोन सेवा ही महागणार? वाचा कारण काय?
'आणखी एका वावटळीसाठी तयार राहा'
गुंतवणूकदारांनी आणखी एका वावटळीला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हावं असा इशारा कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी गुरुवारी (11 एप्रिल) दिला आहे. अमेरीकेत महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढलाय. त्यामुळे येत्या काही दिवसांत तिथे होऊ घातलेली व्याजदरातली कपात आता पुढे ढकलली गेली आहे. ती आता अमेरिकेतील निवडणूकीच्या जवळ होईल. आणि तीही होईलच याची खात्री नाही. कच्चे तेल पुन्हा एकदा $९०/ बॅरल वर गेल्याने भारतासह सगळीकडे वस्तूचे दर चढेच राहणार आहेत, असं निरिक्षण कोटक यांनी सोशल मीडिया साईट X वर व्यक्त केलंय.