Gold Rate : सोन्याच्या दराने गाठला उच्चांक; दिवाळीपर्यंत 1,25,000 चा आकडा पार करणार?

Gold Rate : सराफा बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 1,25,000 पर्यंत पोहोचू शकतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
जळगाव:

मंगेश जोशी,  प्रतिनिधी

सोने आणि चांदीच्या दराने सध्या इतिहासातील उच्चांक गाठला आहे. वर्षभरापूर्वी सोन्यात (Gold) केलेली गुंतवणूक 43% तर चांदीत (Silver) केलेली गुंतवणूक 62% परतावा देऊन गुंतवणूकदारांसाठी मोठी लाभदायक ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भू-राजकीय घडामोडी आणि अमेरिकेतील धोरणांमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 1,25,000 पर्यंत पोहोचू शकतो.

मौल्यवान धातूंच्या दरात विक्रमी वाढ

मागील वर्षभरात (October 1, 2024 ते September 30, 2025) सोने आणि चांदीच्या दरांनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. या एक वर्षाच्या कालावधीत सोन्याच्या भावात तब्बल 43% तर चांदीच्या भावात 62% ची विक्रमी वाढ झाली आहे.

केवळ वर्षभरातच नाही, तर मागील सहा महिन्यांत सोन्याच्या दरात 20,500 रुपये आणि चांदीच्या दरात  43,000 रुपये इतकी मोठी वाढ नोंदवली गेली. तसेच, मागील एका महिन्यात (मासिक आकडेवारीनुसार) सोन्याच्या किमती 12,700 रुपयांनी, तर चांदीच्या किमती 23,000 रुपयांनी वधारल्या आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, कमी कालावधीतही या दोन्ही मौल्यवान धातूंनी उच्चांकी झेप घेऊन गुंतवणूकदारांना भरघोस फायदा मिळवून दिला आहे.
 

( नक्की वाचा : Arattai vs WhatsApp: व्हॉट्सॲपला टक्कर देणारे 'अरट्टाई' ॲप कशासाठी चांगले? वाचा, 'दोघां'मधील मोठा फरक )
 


सोन्याच्या तुलनेत चांदीने टक्केवारीनुसार अधिक मोठा परतावा दिला असून, अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी आता चांदीकडेही वळले आहेत.

जागतिक घडामोडींचा थेट परिणाम

सोन्याच्या भावातील या विक्रमी वाढीमागे अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत. 2024 मध्ये रशिया-युक्रेन आणि इझ्राईल-हमास यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता वाढली, ज्यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढली.

Advertisement

जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक धोरण जाहीर होताच सोन्याचे भाव 82,000 रुपयांवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी 'टेरिफ वॉर'ची घोषणा केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यासोबतच चांदीच्या गुंतवणुकीलाही प्राधान्य दिले.

विक्रमी उच्चांक

2024 अखेरीस सोन्याचे भाव 79,000 आणि चांदीचे भाव 95,000 पर्यंत पोहोचले होते. जून 2025 मध्ये जागतिक भू-राजकीय तणाव, डॉलरची घसरण आणि फेडरल बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता यामुळे सोन्याने 1,00,000 चा आणि चांदीने 1,00,000 चा टप्पा पार केला. ऑगस्ट 2025 पर्यंत सोन्याचे भाव 1,03,500 आणि चांदीचे भाव 1,21,000 पर्यंत वाढले.

Advertisement

दिवाळीला किती असेल भाव?

सप्टेंबर महिन्यातील तेजी: सप्टेंबर महिन्यात मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मोठी खरेदी झाली. तसेच, अमेरिका आणि चीनमधील 'टेरिफ' धोरणांमुळे वाढलेला तणाव, अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती आणि कमी व्याजदराचे वातावरण यामुळे ऑगस्टच्या तुलनेत सोन्याच्या भावात 10% तर चांदीच्या भावात तब्बल 20% नी वाढ झाली.

सध्याचे दर: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच चांदीने 1,50,000 चा टप्पा ओलांडला असून, सोन्याचा भाव 1,18,000 पर्यंत पोहोचला आहे.

दिवाळीपर्यंतचा अंदाज: जागतिक तज्ज्ञांनी 2026 पर्यंत सोन्याचे भाव सव्वा लाखापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, सध्याची तेजी आणि जागतिक अनिश्चितता पाहता, भारतीय सराफा व्यावसायिक आणि अर्थतज्ज्ञांनी दिवाळीपर्यंत (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 1,25,000 पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Advertisement

 सोन्याच्या गुंतवणुकीसोबतच चांदीच्या किमतीनेही मोठी झेप घेतल्यामुळे, गुंतवणूकदारांनी चांदीच्या पर्यायाचा विचार केल्यास मोठा लाभ होऊ शकतो, असा सल्ला अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. 
 

Topics mentioned in this article