Hindenburg Research Shutting Down: हिंडेनबर्ग रिसर्चला कायमचा टाळा; कंपनीच्या मालकांकडून मोठी घोषणा

एक्स माध्यमावर पोस्ट करत त्यांनी कंपनी बंद करत असल्याचे सांगितले असून यामध्ये त्यांनी कंपनीची वाटचाल, संघर्ष आणि मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Hindenburg Research Shutting Down: भारतीय उद्योगपती गौतम अदाणी आणि त्यांच्या कंपनींना टार्गेट करणारी अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चचे दुकान कायमचे बंद होणार आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी याबाबची घोषणा केली आहे. एक्स माध्यमावर पोस्ट करत त्यांनी कंपनी बंद करत असल्याचे सांगितले असून यामध्ये त्यांनी कंपनीची वाटचाल, संघर्ष आणि मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च आता कायमचे बंद पडले आहे.  कंपनीचे संस्थापक नॅट अँडरसन यांनी ही घोषणा केली आहे.  गेल्या वर्षीच्या अखेरीस मी कुटुंब, मित्र आणि आमच्या टीमला सांगितले आहे की मी हिंडेनबर्ग रिसर्च विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या तपासात्मक कल्पनांची  पूर्तता केल्यानंतर ती बंद करण्याचा विचार होता, असे अँडरसन यांनी म्हटले म्हणाले.

मी माझ्या बहुतेक नोकऱ्यांमध्ये एक चांगला कर्मचारी होतो पण बहुतेक वेळा माझ्याकडे दुर्लक्ष केले जात असे, मी हुशार नव्हतो, जेव्हा मी ही नोकरी सुरू केली तेव्हा माझ्याकडे इतके पैसे नव्हते. नोकरी सोडल्यानंतर माझ्याविरुद्ध दाखल झालेल्या तीन प्रकरणांमध्ये माझी उर्वरित बचतही संपली. त्यावेळी जर मला जगप्रसिद्ध व्हिसलब्लोअर वकील ब्रायन वूडचा पाठिंबा मिळाला नसता, तर मी पहिल्याच टप्प्यावर अपयशी ठरलो असतो. मी लहान मुलासारखा घाबरलो होतो, असंही अँडरसनने म्हटले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Guardian Minister News:वाद, रस्सीखेच की रुसवे फुगवे ! एक महिन्यानंतर ही पालकमंत्र्यांची नियुक्ती का नाही ?

दरम्यान, 'नकारात्मक विचारांना बळी पडणे आणि इतरांच्या विचारांवर विश्वास ठेवणे खूप सोपे आहे, विशेषतः जेव्हा गोष्टी वाईट वाटतात, परंतु यावर मात करणे शक्य आहे. मला त्याबद्दल खूप आवड होती आणि मी माझ्या भीती आणि असुरक्षिततेला न जुमानता पुढे गेलो. आणि मग हळूहळू आत्मविश्वास गवसत गेला, अशी आठवणही कंपनीच्या मालकांनी  सांगितली आहे.

Advertisement