Home Buying: घर खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा अन् वाचवा लाखो रुपये

समजा घराची किंमत 50 लाख रुपये आहे. तर पुरुषाला मुद्रांक शुल्का पोटी 3 लाख रुपये द्यावे लागतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

जर तुम्ही घर खरेदी करण्याचे नियोजन (Home Buying) करत असाल, तर एक छोटी गोष्ट तुमचे लाखो रुपये वाचवू शकते. ती म्हणजे-घराची नोंदणी तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने करा. होय, फक्त नाव बदलल्याने तुम्हाला मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि करात चांगली सवलत मिळू शकते. देशातील अनेक राज्यांमध्ये महिलांना मालमत्ता नोंदणीवर (Property Registration) कमी मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्यामुळे तुमचे यातून नक्कीच लाखो रुपये वाचणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घराची नोंदणी पत्नीच्या नावावर करण्याचे अनेक फायदे आहेत. याच कारणामुळे आता अनेक लोक घर खरेदी करताना नोंदणी पत्नीच्या (Property Registry charges for Female) नावावर करत आहेत. जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होतो. मात्र, मालमत्ता नोंदणीवर महिलांना मुद्रांक शुल्कात मिळणारी सूट वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, दिल्लीत जर एखाद्या पुरुषाच्या नावावर घर खरेदी केले जाते, तर 6% मुद्रांक शुल्क (Stamp Duty & Registration Charges) भरावे लागते. पण जर तेच घर महिलेच्या नावावर असेल, तर शुल्क फक्त 4% असेल.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Politics: मोठी बातमी! राज ठाकरेंनी अमित शाहंची भेट नाकारली? मनसे नेत्याचा दावा

समजा घराची किंमत 50 लाख रुपये आहे. तर पुरुषाला मुद्रांक शुल्का पोटी 3 लाख रुपये द्यावे लागतील. तर महिलेला फक्त 2 लाख रुपयेच द्यावे लागतात. म्हणजेच, थेट 1 लाख रुपयांची बचत होते. महाराष्ट्रात पुरूषांच्या नावावर घर घ्याचे असेल तर मुद्रांक शुल्क हे 5 टक्के आहे. तर तेच घर महिलेच्या नावाने घेतले तर ते 4 टक्के आहे. म्हणजेच एक टक्के सवलत महिलेला दिली जाते. राजस्थानमध्ये, जर पती-पत्नी दोघांच्या नावावर मालमत्ता घेतली जाते, तर 0.5% ची अतिरिक्त सूट दिली जाते.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shocking News: 3 मिनिटे मुलगा लिफ्टमध्ये अडकला.. घाबरलेल्या पित्याचा जीव गेला, मन सुन्न करणारी घटना

इतकंच नाही, तर जर तुम्ही पत्नीच्या नावावर गृहकर्ज (Home Loan) घेतले, तर त्याचाही फायदा होतो. अनेक बँका आणि वित्तीय कंपन्या महिलांना कमी व्याजदरावर कर्ज देतात. यामुळे तुमच्या EMI मध्ये फरक पडतो आणि कर्जावर एकूण खर्चही कमी होतो. जर तुम्ही घराची नोंदणी पत्नीच्या नावावर केली आणि कर्जही त्यांच्या नावावर घेतले, तर तुम्हाला मुद्रांक शुल्कातही सूट मिळेल. कर्जावरही फायदा होईल. म्हणजेच, जर नियोजन योग्य असेल, तर तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता. त्यामुळे घर खरेदी करताना थोडे स्मार्ट विचार करा आणि जिथे फायदा दिसेल, तिथे निर्णय घ्या.

Advertisement