Home Loan : तुमचा EMI कमी होणार, 'या' बँकांनी कमी केले व्याज दर, इथे करा चेक

Home loan interest rates : तुमच्या खिशाला होम लोनचा EMI जड होत असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Cheapest Home loans in August 2025 : आम्ही तुम्हाला 5 बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी ऑगस्ट 2025 मध्ये व्याज दर कमी केलं आहे.
मुंबई:


Home loan interest rates : स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असंत. हे घर घेण्यासाठी अनेकदा होम लोन घ्यावं लागतं. होम लोनचा हप्ता भरताना बऱ्याचदा तारंबळ उडते. तुमच्या खिशालाही होम लोनचा EMI जड होत असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

ऑगस्ट 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) च्या बैठकीनंतर, देशातील अनेक बँकांनी त्यांचे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये SBI, HDFC बँक, PNB, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे.

MCLR म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) हा एक बेंचमार्क दर आहे. या दरावर बँक त्यांचे फ्लोटिंग रेट लोन, जसे की होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोनवरील व्याज ठरवतात. MCLR मध्ये कपात झाल्यामुळे EMI ची रक्कम कमी होऊ शकते. कर्जाचा कालावधीही कमी होऊ शकतो, ज्यामुळे सध्याच्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो.

पण, लक्षात ठेवा की MCLR नवीन कर्जांवर लागू होत नाही. कारण नवीन फ्लोटिंग-रेट लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) शी जोडलेले असतात. बँक जुन्या ग्राहकांना MCLR वरून EBLR मध्ये शिफ्ट होण्याचा पर्याय देत आहेत.

Advertisement

आम्ही तुम्हाला 5 बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी ऑगस्ट 2025 मध्ये व्याज दर कमी केलं आहे. त्या ग्राहकांना सर्वात स्वस्त कर्ज (Cheapest Home Loans) देत आहेत.

( नक्की वाचा : Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा 'मुड स्विंग', भारतावरील टॅरिफबाबत केली मोठी घोषणा )
 

कोणत्या बँकेने किती व्याज दर कमी केले?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI):  देशातील सर्वात मोठ्या बँकेने MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंट्सपर्यंत कपात केली आहे. SBI चा MCLR सध्या 7.9% ते 8.85% च्या दरम्यान आहे. यापूर्वी तो 7.95% ते 8.9% च्या दरम्यान होता. हे नवीन दर 15 ऑगस्ट 2025 पासून लागू झाले आहेत.

Advertisement

HDFC बँक: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा MCLR 8.55% ते 8.75% च्या दरम्यान आहे. हे नवीन दर 7 ऑगस्ट 2025 पासून लागू झाले आहेत.

बँक ऑफ बडोदा (BOB):  बँकेचे नवीन दर देखील 12 ऑगस्ट 2025 पासून लागू झाले आहेत. बँकेचा ओव्हरनाईट MCLR, 8.10% वरून 7.95% करण्यात आला आहे. त्याचबरोबर, एक महिन्याचा MCLR आता 7.95% झाला आहे, जो यापूर्वी 8.30% होता. याशिवाय, 3 महिन्यांचा MCLR 8.35% आणि 6 महिन्यांचा MCLR 8.65% असेल. तर, बँकेचा एक वर्षाचा MCLR आता 8.8% झाला आहे.

Advertisement

पंजाब नॅशनल बँक (PNB):  पंजाब नॅशनल बँकेने RBI च्या धोरणापूर्वीच 1 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या सर्व कालावधीसाठी MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंट्सची कपात केली होती. त्यांचा ओव्हरनाईट MCLR सध्या 8.15% आहे, तर एक वर्षाचा MCLR 8.85% आणि तीन वर्षांचा MCLR 9.15% झाला आहे.

इंडियन ओव्हरसीज बँक:  बँकेचे नवीन दर 15 ऑगस्ट 2025 पासून लागू झाले आहेत. सध्या त्यांचा ओव्हरनाईट MCLR 8.05% आहे. याशिवाय, एक महिन्याचा MCLR 8.3% आणि एक वर्षाचा MCLR 8.9% झाला आहे.

( नक्की वाचा : UPI Payment Rules: एका दिवसात UPI द्वारे किती वेळा आणि किती पैसे पाठवता येतात? वाचा संपूर्ण माहिती )
 

या बँकांनी होम लोनवरील व्याज दर कमी केल्याचा थेट फायदा त्यांच्या ग्राहकांना मिळेल. म्हणजेच, जर तुमचे या बँकांमध्ये होम, पर्सनल आणि कार लोनसह कोणत्याही प्रकारचे कर्ज चालू असेल, तर तुमच्या कर्जाचा EMI आता पूर्वीपेक्षा कमी होऊ शकतो, ज्यामुळे तुमची मोठी बचत होईल.

Topics mentioned in this article