Intel Layoff : दिग्गज सेमीकंडक्टर कंपनीत होणार कर्मचाऱ्यांची कपात, 15,000 जणांची नोकरी जाणार

Intel Layoff News : जगातील दिग्गज सेमीकंडक्टर कंपनी असलेल्या इंटेलनं कंपनीनं 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
इंटेल कंपनीत गेल्या वर्षाच्या अखेरीस 124,800 कर्मचारी काम करत होते
मुंबई:

Intel Layoff News : जगातील दिग्गज सेमीकंडक्टर कंपनी असलेल्या इंटेलनं कंपनीनं 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं त्यांचा कारभार सुव्यवस्थित चालावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीचे तब्बल 20 अब्ज डॉलर वाचणार आहेत. 

नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीला 1.6 अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला आहे, त्यानंतर कंपमीनं हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जवळपास 18 हजार कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमावावी लागणार आहे. 

'आमची दुसऱ्या तिमाहीमधील कामगिरी निराशाजनक होती. आम्ही प्रमुख उत्पादन आणि तंत्रज्ञानातील महत्त्वाचे टप्पे गाठल्यानंतरही ही निराशा सहन करावी लागली,' अशी माहिती इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट ग्लेसिंगर यांनी दिली आहे. 

'आमच्या अपेक्षेपेक्षा दुसऱ्या सहामाहीतील ट्रेंड अधिक आव्हानात्मक आहेत. आम्ही खर्च कपातीच्या योजनेचे अंमलबजावणी करुन, कंपनीचा नफा सुधारण्यासाठी तसंच ताळेबंद मजबूत करण्यासाठी सक्रीय पावलं उचलत आहोत,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

कुणावर होणार परिणाम?

इंटेलमध्ये गेल्या वर्षाच्या अखेरीस 124,800 कर्मचारी काम करत होते. यामधील 15 टक्के म्हणजेच साधारण 15,000 जणांना त्यांची नोकरी गमावावी लागणार आहे. कंपनीनं जून महिन्यामध्ये इस्रायलमधील एक मोठा प्रकल्प थांबवण्याची घोषणा केली होती. हे निर्णय मार्केटमधील परिस्थिती, बाजारातील गतीशीलता आणि जबाबदार भांडवल व्यवस्थापन यावर अवलंबून असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.

( नक्की वाचा : मराठवाड्यासाठी मोठा दिवस ! 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा )
 

एनविडिया आणि एमडी या प्रतिस्पर्धी सेमीकंडक्टर कंपनी वेगानं विस्तार करत असतानाचा इंटेलनं कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एनवायडियानं तर नव्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करत वेगानं विस्तार केलाय. त्याचवेळी पांपारिक सेमीकंडक्टरचा वापर करणाऱ्या इंटेलला सध्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. 

Advertisement

गेल्या अनेक दशकांपासून इंटेलचं लॅपटॉप ते टेटा सेंटरपर्यंतच्या सेमी कंडक्टर मार्केटमध्ये वर्चस्व होतं. पण, गेल्या काही वर्षात त्यांच्या स्पर्धक कंपनी विशेषत: एनविडियानं स्पेशलाइज्ड AI प्रोसेसरवर भर दिला आहे. 
 

Topics mentioned in this article