Stock Market Live News Update: आज म्हणजेच 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) मतमोजणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांचे शेअर मार्केटमध्ये पडसाद उमटले आहेत. शेअर मार्केटमध्ये सुरुवातीलाच घसरण झाली. सेंसेक्स 1600 अंकांपेक्षा जास्त घसरण होऊन 76,285.78 अंकांवर सुरु झाला. तर NSE निफ्टी 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला असून 23,179.50 अंकांवर सुरु झाला.
शेअर मार्केटमध्ये सकाळी 9.30 वाजता 2,116.16 अंक म्हणजेच 2.77 टक्क्यांची मोठी घसरण झाली. ज्यामुळे 22,603.05 लेव्हलवर मार्केट सुरु होते. तर, निफ्टीमध्ये 660.85 अंकांची (2.84%) घसरण होऊन तो 22,603.05 अंकावर होता.
( LIVE Election Results 2024 : मुंबईची गॅरंटी कुणाला? )
यापूर्वी एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर येणार असं भाकित व्यक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर स्टॉक मार्केटचा प्रमुख बेंचमार्क असलेल्या इंडेक्स सेंसेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) मोठी उसळी घेतली होती. या चांगल्या संकेतानंतरही बीएसई सेंसेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टीमध्ये (NSE Nifty 50) घसरण झाली.