Gold Rate: सोन्याचा भाव, लाखाच्या आत! भारत-पाक संघर्षामुळे दर गडगडले, चांदीही स्वस्त

Todays Gold Rate: न्याच्या भावात 900 रुपयांची तर चांदीच्या भावात 500 रुपयांची घसरण झाले आहेत. या घसरणीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एक लाखांच्या आत आले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Todays Gold Rate: भारतीय लष्कराकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सिमेवर संघर्ष सुरु आहे. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा शेअर बाजार तसेच सोने चांदीच्या दरावरही मोठा परिणाम पडल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणजे सोन्याचे दर एका लाखावरुन पुन्हा खाली आलेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारत-पाक यांच्या वाढत्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर ही पडला असून परिणामी सोन्याच्या भावातही घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात 900 रुपयांची तर चांदीच्या भावात 500 रुपयांची घसरण झाले आहेत. या घसरणीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एक लाखांच्या आत आले आहेत. 

जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी विना सोन्याचे भाव 96 हजार 600 रुपये व जीएसटी विना चांदीचे भाव 97 हजार रुपये इतके आहेत तर जीएसटीसह सोन्याचे भाव 99 हजार 498 रुपये तर जीएसटी सह चांदीचे भाव 99 हजार 910 रुपये इतके आहेत.  मात्र युद्धजन्य परिस्थितीचा तणाव अधिक वाढल्यास सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातमी - Ratnagiri news: पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला चोप, रत्नागिरीतली घटना

भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर
आज: प्रति 10 ग्रॅम 96,880 रुपये
काल: 96890 रुपये/10 ग्रॅम

 भारतातील चांदीची किंमत
आज: 96870 रुपये प्रति किलो
काल: 96700 रुपये/किलो

नक्की वाचा - India Pakistan News : पाकिस्तानला मिळालं IMF कडून कर्ज? तब्बल 1 अब्ज डॉलर मिळाल्याचा पाकिस्तानच्या पीएमचा दावा  

Advertisement