देशातील सर्वात मोठे खासगी बंदर असलेल्या मुंद्रा पोर्टने इतिहास रचला आहे. 200 MMT पेक्षा जास्त कार्गो हाताळणारे भारतातील पहिले बंदर बनण्याचा मान 'मुंद्रा' नं मिळवलाय. देशाच्या वाढत्या व्यावसायिक प्रभावाचं हे प्रतिक मानलं जात आहे.
अदाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने मार्च 2025 मध्ये 41.5 MMT ची हाताळणी केली आहे. त्यांनी 9% ची वार्षिक वाढ नोंदवून आतापर्यंतची सर्वोच्च कार्गो हाताळणी केली आहे. ही वाढ प्रामुख्याने कंटेनर कार्गोमध्ये 19% लिक्विड आणि गॅस शिपमेंटमधील 5% वाढीमुळे झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंद्रा बंदराने या आर्थिक वर्षात 200.7 MMT कार्गो हाताळले. 200 MMT पेक्षा जास्त कार्गो ओलांडणारे ते भारतातील पहिले बंदर बनले आहे. ही उपलब्धी म्हणजे देशाच्या लॉजिस्टिक क्षमतांना नव्या उंचीवर नेण्याचा हा दाखला आहे. त्याचबरोबर विंजियम पोर्टनं 1 लाख टीईयूचा आकडा पार करत नवा टप्पा गाठला आहे.
देशातील सागरी व्यापाराचं भविष्य
भारतामधील सागरी व्यापार सतत नवेवे विक्रम करत आहे. एकेकाळी मर्यादीत साधनांनी या देशात सागरी व्यापार सुरु झाला होता. पण, आज भारत आपल्या बंदरांच्या माध्यमातून जागतिक व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. एकेकाळी सामान्य प्रक्रिया मानली जाणारी कार्गो हाताळणी आता आर्थिक विकासाची धुरा बनली आहे.
आधुनिक मशिनरी, स्मार्ट पोर्ट्स आणि ऑटोमेटेड लॉजिस्टिक्सने भारताच्या बंदरांना नवीन उंचीवर नेले आहे.आज भारत स्वत:ची फक्त लॉजिस्टिक्स आणि बंदर संरचना आधुनिक बनवत नसून, जगभरातील मोठ्या व्यापार केंद्रांची सूची आपल्या स्थानावर मजबूत करत आहे.कार्गो हाताळणी आता केवळ एक प्रक्रिया राहिली नसून ते आर्थिक वाढीचे इंजिन बनले आहे.आधुनिक तंत्रज्ञान आणि सुव्यवस्थित लॉजिस्टिकसह, भारत आपला सागरी व्यापार नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे.