Noel Tata : टाटा ट्रस्टचा नवा अध्यक्ष ठरला, बैठकीत झाला एकमतानं निर्णय

जाहिरात
Read Time: 2 mins
N
मुंबई:

Noel Tata Appointed New Chairman Of Tata Trusts : रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी बुधवारी (9 ऑक्टोबर) मुंबईमध्ये निधन झालं. त्यानंतर त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल टाटा यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नोएल टाटा हे सध्या 67 वर्षांचे आहेत. टाटा स्टील आणि टायटन या घड्याळ कंपनीचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या आई सिमोन टाटा या मुळच्या फ्रेंच-स्विस कॅथलिक आहेत. त्या सध्या ट्रेंट, व्होल्टा, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष आहेत.

'NDTV Profit' ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून नोएल टाटा यांच्या नावावर ट्रस्टच्या कार्यकारी समितीमधील सदस्यांची सहमती होती. त्यांना रतन टाटांचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात होतं. टाटा ग्रुपच्या 2000 सालापासूनच्या यशात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. 

टाटांच्या वेगगळ्या 14 ट्रस्टची टाटा ट्रस्ट ही मुख्य संस्था आहे. या ट्रस्टची मालकी सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्याकडं आहे. या दोन्ही ट्रस्टचे प्रत्येकी 50 टक्के शेअर्स आहेत. 

टाटा ट्रस्टकडून त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी एक कार्यकारी समिती नियुक्त केली जाते. ही समिती ट्रस्टच्या सर्व कामकाजाचावर देखरेख करते. आतापर्यंत रतन टाटा या ट्रस्टचे संचालक होते. आता नोएल टाटा यांची त्या पदावर निवड झाली आहे. वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह हे या ट्रस्टचे उपसंचालक होते. तसंच मेहली मिस्त्री हे देखील या ट्रस्टचे सदस्य आहेत. 

सर रतन टाटा ट्रस्टचे सदस्य

विजय सिंह, उपसंचालक
वेणू श्रीनिवासन, उपसंचालक
JN टाटा
नोएल टाटा
जहांगीर HC जहांगीर
मेहली मिस्त्री
डेरियस खंबाता

दोराबजी टाटा ट्रस्टचे सदस्य

विजय सिंह,  उपसंचालक
वेणू श्रीनिवासन, उपसंचालक
प्रमित झावेरी
नोएल टाटा
मेहली मिस्त्री
डेरियस खंबाता

रतन टाटा यांना जिमी टाटा हे सख्खे भाऊ आहेत. रतन टाटा यांच्यापेक्षा दोन वर्ष लहान असलेले जिमी कौंटुंबिक व्यवसायात सहभागी नाहीत. ते मुंबईतील कुलाबामध्ये एका 2BHK फ्लॅटमध्ये साधेपणानं आयुष्य जगतात.

( नक्की वाचा : Ratan Tata Family : 2 BHK मध्ये राहणाऱ्या रतन टाटांच्या सख्ख्या भावाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? )

Topics mentioned in this article