तुम्ही सोनं, चांदी विकण्यााचा विचार करत आहात? विक्रीपूर्वी वाचा Income Tax चे नियम

Income Tax Rules For Jewellery:  तुम्ही दागिन्यांची विक्री करण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला हे नियम माहिती हवेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Income Tax Rules For Jewellery:  दागिने हा संपत्तीचा महत्त्वाचा घटक आहे. दागिने हा फक्त मित्रमंडळीत किंवा लग्न समारंभात मिरवण्यासाठीच वापरले जात नाहीत. तर, अडीअडचणीला त्याची विक्री करुन निकड भागवण्यासाठी देखील दागिन्यांचा उपयोग होतो. दागिन्यांच्या विक्रीनंतर मिळणारा फायदा हा नफा समजला जातो. त्यामुळे त्यावर टॅक्स लागतो. दागिन्यांची विक्री केल्यानंतर किती टॅक्स लागतो? हा टॅक्स वाचवण्यासाठी काय करावं? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

दागिने ही भांडवली मालमत्ता समजली जाते. त्यामुळे या मालमत्तेची विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या नफ्यावर भांडवली नफा म्हणून कर आकारला जातो. होल्डिंग कालावधीनुसार तुमच्या भांडवली नफ्यावर कर आकारला जाऊ शकतो. दागिन्यांची विक्री होऊन जो नफा मिळतो त्याच्यावर जो नफा होतो त्याच्यावर होल्डिंग कालावधीनुसार होल्डिंग कालावधीनुसार दीर्घकालीन किंवा अल्पकालीन भांडवली नफा म्हणून कर आकारला जातो.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 
अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली नफा कर कधी लागू होईल?

तुम्ही दागिने खरेदी केल्यानंतर 24 महिन्यांनंतर त्याची विक्री केली तर त्या विक्रीवर होणाऱ्या फायद्याला दीर्घकालीन भांडवली नफा (Long Term Capital Gain) मानला जातो. तुम्ही यापेक्षा कमी कालावधीमध्ये दागिन्यांची विक्री केली तर त्यावर होणाऱ्या नफ्यावर अल्पकालीन भांडवली नफ्याच्या (Short Term Capital Gain) हिशेबानं कर लागतो. अल्पकालीन भांडवली नफ्याला तुमचे नियमित उत्पन्न मानले जाते. त्यामुळे त्यावर तुम्हाला लागू असलेल्या स्लॅब दरानुसार टॅक्स लागतो. 

तुम्ही तुमच्या दागिन्यांची विक्री 23 जुलै 2024 पूर्वी केली असेल तर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर  (Long Term Capital Gain - LTCG) इंडेक्सेशननंतर 20% समान दरानं कर लावण्यात येईल. इंडेक्सेशनशिवाय लाँग टर्म कॅपिटल गेनवर 12.50 टक्के एकसमान दरानं कर लागेल. 

( नक्की वाचा : Fixed Deposit: बायको नाही तर आईच्या नावावर करा FD, भक्कम व्याजासह मिळतील अनेक फायदे )
 

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा (Basic Exemption Limit)

सामान्य श्रेणीतील करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.50 लाख रुपये आहे. अर्थात वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या करदात्यांसाठी ही मर्यादा 3 लाख आहे. तर 80 पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यत कोणताही इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. तुम्ही नव्या कर प्रणालीचा स्वीकार केला असेल तर सर्वांसाठीच करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 3 लाख रुपये आहे. 

Advertisement

दागिन्यांवरील LTGG टॅक्स वाचवण्याची पद्धत (Avoid paying LTCG tax on jewellery)

तुम्ही एका निर्धारित कालावधीमध्ये भारतामध्ये कोणतीाही रहिवाशी मालमत्तेच्या खरेदीसाठी किंवा निर्मितीाठी पैसै वापरणार असाल तर तुम्हाला दागिन्यांवर होणाऱ्या नफ्यावर दीर्घकालीन भांडवली नफा कर देण्याची गरज नाही. तुम्हाला दागिन्यांची विक्री केल्यानंतर दोन वर्षांमध्ये त्याचा वापर करुन घर खरेदीवर सूट मिळते. तुम्ही घर बांधण्यासाठी दागिन्यांची विक्री केली असेल तर त्यासाठी सूट मिळण्याची मूदत 3 वर्ष आहे. यापूर्वी या सूटीवर कोणतीही मर्यादा नव्हती. आता 10 कोटी ही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.