एनडीटीव्ही प्रॉफिटचे विकसित भारत @2047 हे कॉन्क्लेव मुंबईत सुरु झाले. यामध्ये देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज तसंच राजकारणी एकाच स्टेजवर भारताच्या रोडमॅपवर चर्चा करत आहेत. या कॉन्क्लेवची सुरुवातीला एनडीटीव्हीचे एडिटर इन चीफ संजय पुगलिया यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगात ठळक स्थान बनला आहे.आजचा भारत लोकशाही विश्वाला स्थिर विकासाकडे नेण्याचे काम करत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या कॉन्क्लेवच्या सुरुवातीला पुगलिया यांनी सांगितलं की, अमेरिकेत सरकार बदलल्यानंतर जागतिक राजकारण बदललं आहे. त्यानंतर अनिश्चितता वाढली आहे. या सर्वांमध्ये नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामध्ये भारत फक्त ब्राईट स्पॉट नाही तर वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. संपूर्ण लोकशाही विश्वाला विकासाकडं नेण्याचं काम भारत करत आहे. आगामी काही दिवसांमध्ये याबाबत अधिक स्पष्टता येईल.
( नक्की वाचा : अमेरिकेतील भयंकर कायद्याला ट्रम्पकडून स्थगिती, अदाणी समूहासाठी Good News )
पुगलिया यांनी सांगितलं की, भारतामधील आर्थिक विकासाच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. संसदेत सादर झालेला केंद्रीय अर्थंकल्प याचे उदाहरण आहे. आपल्या विकासाची दिशा काय असेल हे या बजेटमध्ये स्पष्ट केले आहे. ही दिशा पुढं जाण्याची आहे. ते म्हणाले की जेव्हा बाजारातून नफा कमावल्यानंतर एफपीआय (फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूक) बाहेर पडत आहे, तेव्हा मोठ्या संख्येने भारतीय बाजारात येत आहेत आणि त्याला स्थिरता देत आहेत. हे भारतीय बाजारपेठेला वरच्या दिशेने घेऊन जात आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत झालेला घसरण गुंतवणुकदारांसाठी काळजीचा विषय आहे. पण, बाजारातील प्रत्येक घसरण ही नव्या गुंतवणूकदारांसाठी आणि पुढं येत असलेल्या भारतीय गुंतवणुकदारांसाठी एक संधी आहे. त्यामुळे यापूर्वी एफपीआयच्या येण्या-जाण्याने बाजाराची दिशा आणि विकास निश्चित होईल, असं वाटत जात होतं. पण, आपण आता त्याच्या पुढे गेलो आहोत. ही भारतासाठी नवी आणि मोठी गोष्ट आहे.