सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात मोठा बदल, 'हे' काम करा अन्यथा बंद होईल तुमचं खातं

New guidelines for Sukanya Samriddhi Yojana: तुम्ही तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
S
मुंबई:

New guidelines for Sukanya Samriddhi Yojana: तुम्ही तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. अर्थमंत्रालयानं या योजनेतील मार्गदर्शक तत्वांमध्ये मोठे बदल केले आहेत. या योजनेतील बचत खाती (Savings accounts) उघडताना झालेल्या चुका नीट करणे हा या बदलांचा उद्देश आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून हे नियम लागू होणार आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 


कोणती खाती होणार बंद?

नव्या नियमानुसार ज्या मुलींची खाती त्यांचे आई-वडील किंवा कायदेशीर पालकांनी उघडलेली नाहीत ती त्यांना आई-वडील किंवा त्यांच्या कायदेशीर पालकांकडं हस्तांतरित करावे लागतील. नव्या नियमानुसार फक्त आई-वडील आणि कायदेशीर पालकच सुकन्या समृद्धी योजनेनुसार खातं उघडू किंवा बंद करु शकतात. 

तुम्ही सुकन्या योजनेनुसार दोन खाती उघडली असतील तर ती खाती बंद केली जाणार आहेत. ही खाती नियमांच्या विरुद्ध समजली जातील.

ज्या मुलींचं सुकन्या समृद्धी योजनेतील खातं (Sukanya Samriddhi Yojana - SSY) त्यांच्या आजी-आजोबांनी किंवा अन्य नातेवाईंकांनी उघडलं असेल तर त्यांना ते आई-वडिलांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील ते पाहूया

ओरिजनल अकाऊंट पासबूक : हे आवश्यक आहे. कारण यामध्ये खात्याची विस्तृत माहिती दिलेली असते.
मुलीचे जन्म प्रमाणपत्र : हा मुलीचे जन्म तसंच मुलीचे पालकाशी असलेल्या नात्याचा पुरावा आहे.
मुलीचे पालक असल्याचा पुरावा : जन्म प्रमाणपत्र किंवा अन्य कायदेशीर कागदपत्र, जे मुलगी आणि पालक यांचं नातं सिद्ध करतील.
नव्या पालकांचे ओळखपत्र : मुलींच्या नव्या पालकांना सरकारद्वारे जारी ओळखपत्र जमा करावे लागेल. 
अर्ज : ज्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खातं उघडलं असेल तिथं हा फॉर्म मिळेल. हस्तांतरण प्रक्रिया सुरु करायची असेल तर हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.  

(नक्की वाचा : महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई )
 

खातं हस्तांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया ( (Step-by-step process to transfer account)


- सर्वात पहिल्यांदा वर्तमान खातेधारक (आजी-आजोबा) आणि नवे पालक (आई-वडील) यांच्या ओळखपत्रासह (Identification Proof) सर्व आवश्यक कागपत्र जमा करा
- त्यानंतर ज्या ठिकाणी हे खातं उघडलं आहे, त्या ब्रँचमध्ये जा
- बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात खातं बदलण्याचा फॉर्म घ्या
- फॉर्ममध्ये योग्य ठिकाणी आजी-आजोबा आणि आई-वडिलांची योग्य माहिती तसंच सर्व कॉलम योग्य पद्धतीनं भरा
- फॉर्मवर आजी- आजोबा तसंच आई-वडिलांच्या सह्या आहेत याची खात्री करा. अर्जाच्या पडताळणीसाठी ही आवश्यक बाब आहे.
- सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्वारक्षरी केलेला ट्रान्सफर फॉर्म बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा
- फॉर्म आणि संबंधित कागदपत्रं मिळाल्यानंतर बँक किंवा पोस्ट खात्याचे कर्मचारी त्याची पडताळणी करतील. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन पालकांचे तपशील तुमच्या मुलीच्या खाते रेकॉर्डमध्ये अपडेट होईल.