Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आगामी वर्ष 2025- 26 देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांनी आपला आठवा अर्थसंकल्प सादर करताना शेती, आरोग्य, पर्यटन आणि शैक्षणिक क्षेत्रांवर मोठा भर दिला आहे. या बजेटमध्ये केंद्र सरकारने कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सर्वात मोठी घोषणा केली असून कॅन्सरची औषधे स्वस्त करण्यात आली आहेत.
( Union Budget 2025 : पुढच्या आढवड्यात नवे आयकर विधेयक सादर केले जाणार )
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पामध्ये उत्तम आरोग्यव्यवस्था पुरवण्यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले असून याच पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये २०० डे केअर सेंटर उघडले जातील, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर सेंटर सुरु केली जाणार आहेत. तसेच जीवनरक्षक औषधांच्या किमती कमी होतील, ज्यामध्ये 36 औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे.
दरम्यान, स्टार्टअपसाठी कर्जाची मर्यादा 10 कोटीवरून 20 कोटी करण्यात आली आहे. गॅरंटी फि सुद्धा कमी करण्यात आली आहे. तसेच पर्यटन क्षेत्राबाबतही सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून 50 नवी पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. त्याचबरोबर MSME साठी लोन गॅरंटी कव्हर 5 कोटीवरून 10 कोटी करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )