Union Budget 2025: हे सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणारे बजेट आहे. आम्ही अनेक नवी दालने युवा वर्गासाठी खुली केली आहेत. हा अर्थसंकल्प तुमची सेव्हिंग, तुमची प्रगती वाढवेल. असे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानत हे बजेट सर्वसामान्यांसाठी ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
"आज सादर झालेला अर्थसंकल्प हा प्रत्येक भारतीयांच्या इच्छा आणि आकांशा पूर्ण करणारे, चारी बाजूंनी रोजगाराच्या संधी वाढवणारे हे बजेट आहे, त्यासाठी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांच्या टीमचे या जनताजनार्धनच्या बजेटसाठी आभार मानतो, असे म्हणत आज देश विकासाचा वारसा घेऊन पुढे जात आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
( नक्की वाचा : Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली; 'पंतप्रधान धनधान्य योजने'ची घोषणा )
या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना करातून सूट देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पंतप्रधान मोदी म्हणाले, हा अर्थसंकल्प नागरिकांचे खिसे भरणारा आहे. या अर्थसंकल्पातून स्वावलंबी भारताला गती मिळेल. अर्थसंकल्पात मध्यमवर्गावर विशेष लक्ष देण्यात आले आहे तसेच या अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी नवीन क्रेडिटची घोषणा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
(नक्की वाचा- Union Budget 2025 : विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारला मोठी भेट, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा)
सहसा अर्थसंकल्पाचा भर सरकारी तिजोरी कशी भरायची यावरच असतो? पण हे बजेट त्याच्या अगदी उलट आहे. हे बजेट देशातील नागरिकांचे खिसे कसे भरेल, देशातील नागरिकांची बचत कशी वाढवेल आणि देशातील नागरिक विकासात कसे भागीदार होतील? यावर भर देईल, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.