Budget 2025 Date : बजेटची तारीख आणि वेळ का बदलण्यात आली? तुम्हाला माहिती आहे का कारण?

Union Budget 2025 Date : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी (working day) संध्याकाळी साडेपाच वाजता बजेट सादर केले जात असे. ती वेळ आणि तारीख का बदलण्यात आली?

जाहिरात
Read Time: 2 mins
India Budget 2025 : बजेटची तारीख बदलताना ब्रिटीश साम्राज्यवादी कालखंडतील परंपरा तोडण्याबरोबरच आणखी एक कारण होतं.
मुंबई:

Budget 2025 Date : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करणार आहेत. हे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले पूर्णकालीन बजेट असेल. सीतारमण यांनी 2024 लोकसभा निवडणुकीनंतर बजेट सादर केले होते. पण, ते काही महिन्यांसाठी होेते. आता संपूर्ण आर्थिक वर्षासाठी ते बजेट सादर करतील.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का झाला तारखेत बदल?

2017 साली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटच्या तारखेत बदल करण्याची घोषणा केली. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी (working day) सादर केला जात असे. बहुतेक वेळा 28 फेब्रुवारीला अर्थमंत्री संसदेत बजेट सादर करत. ही तारीख बदलण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये (Colonial Era) बजेट हे 28 फेब्रुवारीला सादर केले जात असे. देश स्वतंत्र झाल्यावरही ती परंपरा सुरुच होती. बजेटची तारीख बदलताना ब्रिटीश साम्राज्यवादी कालखंडतील परंपरा तोडण्याबरोबरच आणखी एक कारण होतं.

बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला सादर झाल्यानंतर त्यामधील तरतूदी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून (1 एप्रिल) लागू करण्यात अडचणी येत असत. या प्रशासकीय अडचणीवर मात करण्यासाठी जेटली यांनी बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याची सूचना दिली होती. 2017 सालापासून त्याची अंमलबजावणी झाली. 

Advertisement

( नक्की वाचा :  तुम्ही सोनं, चांदी विकण्यााचा विचार करत आहात? विक्रीपूर्वी वाचा Income Tax चे नियम )

वेळेतही झाला बदल

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळेतील बदल 1999 साली करण्यात आला. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार होते. यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते. संध्याकाळी पाच वाजता बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटीश काळात सुरु झाली होती. 

Advertisement

भारतीय प्रमाणवेळ ब्रिटनपेक्षा साडेपाच तास पुढे आहे. भारतामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता बजेट मांडण्यास सुरुवात होई. त्यावेळी ब्रिटनमध्ये सकाळचे 11 वाजलेले असतं. ब्रिटनमधील कार्यालयीन कामकाज सुरु झाल्यानंतर भारतामध्ये बजेट सादर केले जाई.भारत 1947 साली स्वतंत्र झाला. पण, त्यानंतरची पाच दशकं ब्रिटीश राजवटीमधील परंपरा सुरु होती. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात ती परंपरा रद्द झाली. 
 

Topics mentioned in this article