Union Budget 2025 : विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारला मोठी भेट, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

Union Budget 2025 : बिहारमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद केंद्रीय अर्थसंकल्पात देखील उमटले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बजेटमध्ये सुरुवातीलाच बिहारला एक गिफ्ट दिलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

यआUnion Budget 2025 : बिहारमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद केंद्रीय अर्थसंकल्पात देखील उमटले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बजेटमध्ये सुरुवातीलाच बिहारला एक गिफ्ट दिलं. 

बिहारमध्ये मखानाचे उत्पादन आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, अशी घोषणा सीतारमण यांनी केली.  अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांचे राष्ट्रीय अभियान सुरू केले जाईल. बिहारमधील शेतकऱ्यांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

( Union Budget 2025 : पुढच्या आढवड्यात नवे आयकर विधेयक सादर केले जाणार )
 

सीतारामण यांनी यावेळी सांगितलं की, उत्पादन, मुल्यवर्धन आणि मार्केटींमध्ये सुधारणा होण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. मखना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्याचबरोबर संबंधित शासकीय योजनांचा लाभही शेतकऱ्यांना दिला जाईल. 

बिहारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये केली. बिहारमधील रोजगाराच्या संधी कमी आहेत. राज्यातील रोजगारामध्ये वाढ करण्यासाठी ही घोषणा महत्त्वाची मानल जात आहे. 

Advertisement

पाटणा विमानतळाचा विस्तार करण्याची घोषणा देखील केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. 

( नक्की वाचा : Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली; 'पंतप्रधान धनधान्य योजने'ची घोषणा )
 

अर्थमंत्र्यांच्या साडीचे बिहार कनेक्शन

निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना मधुबनी आर्टची साडी नेसली आहे. पद्मश्री दुलारी देवींनी त्यांना ही साडी भेट म्हणून दिली आहे. 2021 मध्ये दुलारी देवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं.  दुलारी देवींना श्रद्धांजली म्हणून अर्थमंत्र्यांनी ही साडी नेसली आहे. त्याचबरोबर बिहारच्या कला आणि संस्कृतीला सन्मान देण्यासाठी देखील ही साडी नेसल्याचा संदेश अर्थमंत्र्यांनी बजेटच्या दिवशी दिला. आगामी बिहार विधानसभा निवडणुकींपूर्वी अर्थमंत्र्यांची ही कृती महत्त्वाची मानली जात आहे.  

Topics mentioned in this article