कोणी- कोणी बनवला आहे अर्थसंकल्प, अर्थमंत्री सीतारमण यांच्या टिममध्ये 'हे' आहेत मुख्य चेहरे

अकरा वाजता अर्थ संकल्प लोकसभेत सादर केला जाईल. या अर्थ संकल्पाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

संसदेत आज केंद्रीय अर्थ संकल्प सादर केला जाणार आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण हा अर्थ संकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या तीसऱ्या टर्मचाहा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या 3.0 चा हा पहिला अर्थसंकल्प असेल. त्या सकाळी 8.40 मिनीटांनी आपल्या घरून निघतील. त्यानंतर त्या थेट अर्थ मंत्रालयात जातील. त्यानंतर सीतारमण सकाळी 9.10 वाजता आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रपती भवनात जातील. त्यानंतर त्या अर्थ संकल्प सादर करण्याची परवानगी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडून घेतील. अकरा वाजता अर्थ संकल्प लोकसभेत सादर केला जाईल. या अर्थ संकल्पाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या अर्थ संकल्पाकडे शेतकरी, तरूण, महिला, नोकरदार यांचे लक्ष लागले आहे. त्यांना या अर्थ संकल्पाकडून मोठी अपेक्षा आहे. अर्थ संकल्प तयार आहे. तो आता सादर केला जाईल. अर्थ संकल्प काही तासात सादर केला जातो. पण तो तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्याची एक मोठी प्रक्रीया आहे. दरम्यान हा अर्थ संकल्प सादर होत असताना निर्मला सीतारमण यांनी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि सर्व सहकाऱ्यां बरोबर चर्चा केली. 

अर्थ संकल्प तयार करण्याची प्रक्रीया ही अर्थ संकल्प सादर करण्याच्या सहा महिने सुरू केली जाते. या कालावधीत अर्थ संकल्प सादर करणारी टीम ही नॉर्थ ब्लॉकमध्येच  सतत काम करत असते. या कालावधीत अर्थ संकल्प सादर करणाऱ्या टीमचा तसा जगाशी संपर्क राहात नाही. ते आपल्या कुटुंबालाही मोजकाच वेळ देवू शकतात. अर्थ मंत्री आपल्या भाषणा द्वारे अर्थ संकल्प सादर करतात. हा अर्थ संकल्प बनवण्यासाठी अनेक विश्वासू आणि मोठे अधिकारी काम करत असतात. 

ट्रेंडिंग बातमी -  Budget 2024: किती वाजता सादर होणार अर्थसंकल्प? अर्थमंत्र्यांचे दिवसभराचे नियोजन पाहा एका क्लिकवर

अर्थ संकल्प कोण बनवतं?  

अर्थ सचिव टी. वी. सोमनाथ हे अर्थ मंत्रालयात काम करण्या आधी पीएमओमध्ये कार्यरत होते. पीएमओमध्ये ते अतिरिक्त सचिव म्हणून काम करत होते. सोमनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे समजले जातात. यावेळी अर्थ संकल्प बनवण्यात त्यांची भूमिका मोठी आहे. 

Advertisement

अरविंद श्रीवास्तव

कर्नाटकातील 1994 बॅचचे आयएएस अधिकारी श्रीवास्तव हे पीएमओमध्ये अर्थव्यवस्था अधिकारी आहेत. ते अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे कामकाज पाहातात. श्रीवास्तव या अर्थ संकल्प बनवणाऱ्या टिमचा एक भाग आहेत. 

हरि रंजन राव 

हरि रंजन रावही पीएमओचे अधिकारी आहे. 1994 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. ते पीएमओमध्ये औद्योगिक विभागाचे काम पाहातात. ते या आधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सचिव राहीले आहेत. या शिवाय दूरसंचार विभागातही त्यांनी काम केले आहे. हा अर्थ संकल्पात त्यांचा ही मोठा वाटा आहे.  

Advertisement

पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा

पी.के. मिश्रा हे पीएमओमधील मोठे नाव आहे. ते पंतप्रधानांचे प्रधान सचिव आहेत. ते सरकार मधील महत्वाच्या कामकाजावर  लक्ष ठेवून असतात. यावेळच्या अर्थ संकल्पात त्यांचे योगदान मोठे आहे. 

पुण्य सलीला श्रीवास्तव

या  1993 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या सरकारच्या समाज कल्याण विभागाचे काम पाहातात. पीएमओमध्ये काम करण्या आधी त्यांनी गृह मंत्रालयात काम केले आहे. 

Advertisement

अन्य अधिकाऱ्यांचाही हातभार 

अर्थ संकल्प बनवणाऱ्या सदस्यात काही आणखी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात महसूल सचिव संजय मल्होत्रा, आर्थिक संबंध विभागाचे सचिव अजय सेठ, तुहीन कांता पांडे, आर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी, मुख्य आर्थिक सल्लागार वी. अनंथा. नागेश्वरन, पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव अतीश चंद्रा यांचा यात समावेश आहे. 

Topics mentioned in this article