लाइफ आणि मेडिकल Insurance Plan स्वस्त होणार? गडकरींनी थेट अर्थमंत्र्यांकडं केली मोठी मागणी

केंद्रीय मंंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केंद्रीय अर्थमंत्र्यांना थेट पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण (Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अनेक स्तरांवरुन टीका होत आहे. त्याचवेळी केंद्रीय मंंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केंद्रीय अर्थमंत्र्यांना थेट पत्र लिहिलं आहे. लाईफ आणि मेडिकल इन्शुरन्स प्लॅनवरील GST काढून टाकावा अशी मागणी केली आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नागपूर विभागीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर आपण अर्थमंत्र्यांना पत्र लिहीत असल्याचे गडकरींनी या पत्रात स्पष्ट केलं आहे. 

लाइफ आणि मेडिकल इन्शुरन्सवरील प्रीमियम हटवण्याचा मुद्दा कर्मचारी संघटनेनं प्रामुख्यानं उपस्थित केला आहे. या दोन्ही इन्शुरन्स प्रीमियमवर 18 टक्के जीएसटी आहे. या प्रीमियमवर जीएसटी लावणे म्हणजे एकप्रकारे जगण्याच्या अनिश्चिततेवर कर लावणे आहे, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्र्यांनी या पत्रात स्पष्ट केलंय. 

( नक्की वाचा : NDTV Exclusive : तरुणांना इंटर्नशिपसाठी कसं तयार करणार? अर्थमंत्र्यांनी दिली संपूर्ण माहिती )
 

कुटुंबाला संरक्षण देण्याच्या हेतूनं जगण्याच्या अनिश्चितेचा धोका कव्हर करणाऱ्या व्यक्तीच्या प्रीमियवर कर लावण्यात येऊ नये असं युनियनचं मत आहे. त्याचप्रमाणे मेडिकल इन्शुरन्सच्या प्रीमियमवर 18 टक्के जीएसटी लावणे हे या व्यवसायवाढीसाठी अडथळा आणणारं आहे. तसंच हा कर रद्द करण सामाजिकदृष्ट्या आवश्यक असल्यानं तो काढून टाकावा, अशी मागणी गडकरी यांनी केली. 

या सर्व मुद्यांच्या आधारावर तुम्ही लाइफ आणि मेडिकल इन्शुरन्सवरील GST रद्द करण्याच्या मागणीवर प्राधान्यानं विचार करावा, अशी विनंती गडकरी यांनी अर्थमंत्र्यांना या पत्रातून केली आहे. 

Advertisement