इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर विजय सेल्सचा मेगा फ्रीडम सेल सुरू झाला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि अप्लायन्सेससारख्या अनेक श्रेणींवर सूट दिली जात आहे. यामध्ये ग्राहकांसाठी सूट तसेच बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनससारखे फायदेही आहेत. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. या सेलमध्ये अनेक वस्तूंवर मोठे डिस्काऊंटही देण्यात आले आहे. त्यामुळे या विजय सेल्सच्या मेगा फ्रीडम सेलची (iPhone price cut) चर्चा सध्या जोरात आहे.
विजय सेल्सवर स्मार्टफोन्सवर मोठं डिस्काऊंट
या सेलमध्ये iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max आणि Samsung Galaxy S25 Ultra सारखे स्मार्टफोन्स मर्यादित कालावधीसाठी कमी किमतीत खरेदी करता येतात. अमेरिकन डिव्हाइस मेकर Apple चा iPhone 16 Pro Max रु 1,44,900 मध्ये लाँच करण्यात आला होता. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 10% सूटसह रु 1,31,000 मध्ये उपलब्ध आहे. iPhone 16 Pro Max मध्ये 6.9-इंच LTPO Super Retina XDR OLED डिस्प्ले (1,320 x 2,868 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 2,000 निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह आहे. यात Apple A18 Pro (3nm) 6-कोर GPU प्रोसेसर दिला आहे. या सेलमध्ये iPhone 16 वर 11% सूट दिली जात आहे.
नक्की वाचा - CIBIL Score: लोन वेळेवर भरूनही क्रेडिट स्कोअर का घसरतो? समजून घ्या आतली 'ABCD'
यामध्ये Android स्मार्टफोन्सवरही सूट मिळत आहे. या सेलमध्ये दक्षिण कोरियाच्या स्मार्टफोन मेकर Samsung चा Galaxy S25 Ultra रु 12,000 च्या सूटसह रु 1,17,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. विजय सेल्सकडून निवडक स्मार्टफोन मॉडेल्सवर मोठी सूट दिली जात आहे. हे स्मार्टफोन्स पूर्णपणे नवीन नाहीत. त्यांना विजय सेल्सच्या शोरूममध्ये डिस्प्ले युनिट्स म्हणून ठेवण्यात आले होते. उदाहरणार्थ, Samsung Galaxy Z Fold 6 चे डिस्प्ले युनिट रु 1,64,999 च्या मूळ किमतीऐवजी रु 99,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. त्याचप्रमाणे, iPhone 13 चे डिस्प्ले युनिट देखील मोठ्या सूटसह उपलब्ध आहे.
या सेलमध्ये HDFC बँकेच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड धारकांना EMI व्यवहारांवर रु 4,500 पर्यंतची इन्स्टंट सूट मिळू शकते. यामध्ये RBL बँक आणि One Card च्या व्यवहारांवरही रु 4,000 पर्यंतची सूट आहे. याशिवाय, या सेलदरम्यान जुने स्मार्टफोन एक्सचेंज करूनही अतिरिक्त सूट मिळू शकते. तथापि, ही सूट जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. त्या मुळे ज्यांना स्मार्ट फोन खरेदी करायचा आहे त्यांनी तातडीने या मेगा फ्रीडम सेलला आवश्य भेट द्या.