दागिने की डिजिटल सोनं, सोन्याच्या गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय बेस्ट?

गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन एन्डेड इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. यामध्ये तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सोनं हा केवळ महिलांच्याच नाही तर गुंतवणुकदारांच्याही (Gold Investment) जिव्हाळ्याचा विषय आहे. पूर्वीच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणं म्हणजे प्रत्यक्षात दागिने वा कॉइन खरेदी करणे मानलं जात होतं. परंतू बदलत्या काळानुसार, सोने खरेदी करण्याचे अनेक पर्याय समोर आले. सोनं हा अशा काही गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक आहे, जो जास्त जोखीम न घेता चांगला परतावा देतो.

सोन्यात गुंतवणूक करण्याचे पर्याय...

सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. यात प्रत्यक्षात सोनं खरेदी, डिजिटल गोल्डस, गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंडचा पर्याय उपलब्ध आहे.

प्रत्यक्ष सोनं खरेदी...

जुना मात्र अनेकांना विश्वासाचा वाटणारा हा पर्याय म्हणजे प्रत्यक्षात जाऊन सोनं खरेदी करणे. यामध्ये तुम्ही सोन्याचे दागिने, सोन्याचे कॉइन किंवा सोन्याची बिस्किटं खरेदी करू शकता. सोन्याचे दर कमी असतील तेव्हा सोनं खरेदी केलं जातं आणि सोन्याचे दर वाढल्यानंतर आपल्या जवळील सोन्याची विक्री केली जाते. यातून चांगला नफा मिळू शकतो.

डिजिटल सोनं...

जर तुम्हाला कमी आणि मर्यादित काळासाठी सोन्यात गुंतवणूक करावयाची असेल तर तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता. गुगल पे, फोन पे सारख्या अनेक अॅपमध्ये सोन्याच्या डिजिटल गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल गुंतवणुकीचा एक मुख्य फायदा असा की तुम्हाला कधीही सोन्यात गुंतवणूक करता येते व सोने दर वाढल्यास त्यातून लगेच परतावा देखील मिळवता येतो.

Advertisement

गोल्ड म्युच्युअल फंड...

यामध्ये गुंतवणूक करणं सध्या प्रचलित आहे. गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन एन्डेड इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे. यामध्ये तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

गोल्ड ईटीएफ...
गोल्ड ईटीएफमध्ये तुम्ही सोनं हे शेअर्स प्रमाणे खरेदी-विक्री करू शकता. यासाठी तुमच्याकडे डिमॅट अकाऊंट असणं आवश्यक आहे. यात गुंतवणूक करण्याची प्रक्रिया ही शेअर बाजारातील गुंतवणूक करण्यासारखीच आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार गोल्डचे युनिट्स खरेदी करू शकता.

Advertisement

पेपर गोल्ड...
हा सोन्यातील गुंतवणुकीचा असा प्रकार आहे ज्यात सर्व व्यवहार पेपरवरच असतो. ज्यात तुम्हाला फक्त पेपरवर सोनं मिळतं. या गुंतवणुकीतील परतावा हा सोन्याच्या किमतीच्या आधारे ठरवला जातो. यामध्ये प्रत्यक्षात सोनं मिळत नाही, परंतू शुद्ध सोन्यात गुंतवणुकीशी संबंधित सर्व फायदे मिळतात. प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्यापेक्षा हा उत्तर पर्याय मानला जातो. जर तुम्हाला दागिन्यांची गरज नसेल तर तुम्हा या पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

सॉवरेन गोल्ड बाँड्स...

हा बाँड 1 ग्रॅम सोन्याचा असतो. म्हणजे 1 ग्रॅम सोन्याची किंमत आणि बाँडची किंमत सारखी असते. सॉवरेन गोल्ड बाँडच्या माध्यमातून तुम्ही 24 कॅरेटच्या 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या बाँड्सच्या परताव्याची भारत सरकार हमी देते आणि अशा प्रकारे, तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक करून सुरक्षित उत्पन्न मिळवू शकता.

Advertisement