Ratan Tata Will : कोण आहेत मोहिनी दत्ता? ज्यांना रतन टाटांनी दिली 500 कोटींची संपत्ती !

Ratan Tata Will : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या संपत्तीमधील जवळपास एक तृतीयांश हिस्सा एका अशा व्यक्तीला मिळणार आहे ज्याबाबत फारशी कुणाला माहिती नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Ratan Tata Will : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या संपत्तीमधील जवळपास एक तृतीयांश हिस्सा एका अशा व्यक्तीला मिळणार आहे ज्याबाबत फारशी कुणाला माहिती नाही. रतन टाटांचं 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. त्यांच्या मृत्यूपत्राची माहिती समोर आली आहे. त्यानुसार रतन टाटा यांनी जवळपास 500 कोटींची संपत्ती मोहिनी मोहन दत्ता (Mohini Mohan Dutta) यांच्या नावावर केली आहे. त्यानंतर मोहिनी दत्ता कोण आहेत? ही चर्चा सुरु झाली आहे.  

रतन टाटांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांचं नाव आहे. टाटांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. प्रोबेटचा कालावधी संपल्यानंतर आणि हायकोर्टानं प्रमाणित केल्यानंतरच त्यांना ही संपत्ती मिळणार आहे. त्यासाठी किमान सहा महिने कालावधी लागू शकतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?

मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूरचे उद्योजक आहे. ते स्टॅलियन कंपनीचे सहमालक आहेत. त्यानंतर ते टाटा सर्व्हिसेसचा भाग बनले. विलिनीकरणाच्या पूर्वी त्यांच्याकडं स्टॅलियनचे 80 टक्के समभाग होते. तर टाटा इंडस्ट्रीकडून 20 टक्के समभाग होते. आपली रतन टाटांची पहिली जमेशदपूरमधील डिलर्स हॉस्पिटलमध्ये झाली होती, त्यावेळी मी फक्त 24 वर्षांचा होतो, अशी माहिती मोहिनी दत्ता यांनी दिली आहे. 

टाटा समुहाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपण टाटा कुटुंबीयांचे जवळचे आहोत, असं दत्त नेहमी सांगत. रतन टाटांनी आपल्याला मदत केली आणि त्यांना प्रशिक्षित केलं, असं दत्ता यांनी काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितलं होतं.

Advertisement

( नक्की वाचा : Who is Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला! टाटा ट्रस्टच्या नव्या संचालकांबाबत वाचा सर्व माहिती )
 

मोहिनी मोहन दत्ता आणि टाटा समूहाचे नाते तब्बल 6 दशकांपासून आहे, असं सांगितलं जातं. डिसेंबर 2024 मध्ये मुंबईतील एनसीपीएमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रतन टाटा यांच्या जयंती कार्यक्रमासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं, अशी कथित माहिती आहे. त्या  कार्यक्रमात फक्त टाटा यांचे कुटुंबीय आणि जवळचे व्यक्ती सहभागी झाले होते. 

फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसारल मोहिनी मोहन दत्ता यांची मुलगी टाटा ग्रुपमध्ये कार्यरत होती. त्या 2015 पर्यंत ताज हॉटेलमध्ये तर 2024 पर्यंत टाटा ट्रस्टमध्ये काम करत होत्या. 

Advertisement
Topics mentioned in this article