विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरावर आज (9 एप्रिल 2025) जगातील सर्वात मोठ्या पर्यावरणपूरक कंटेनर जहाज MSC Turkiye चे स्वागत करण्यात आले.
अदाणी पोर्ट्स आणि SEZ लिमिटेड (APSEZ) द्वारे संचालित, विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर हे भारतातील पहिले मेगा ट्रान्सशिपमेंट कंटेनर टर्मिनल आहे.
MSC Turkiye हे कंटेनर जहाज, Mediterranean Shipping Company (MSC) द्वारे चालवले जाणारे, एक आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार मानले जाते. या जहाजाची लांबी 399.9 मीटर, रुंदी 61.3 मीटर आणि खोली 33.5 मीटर आहे.
हे जहाज 24,346 वीस-फूट समतुल्य युनिट (TEUs) लोड करू शकते, ज्यामुळे ते आतापर्यंत बांधलेल्या सर्वात मोठ्या कंटेनर जहाजांपैकी एक बनले आहे. हे जहाज ज्या विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरामध्ये दाखल झाले ते देखील जागतिक दर्जाचे, भविष्यासाठी तयार असलेले बंदर आहे.
हे भारतीय उपखंडातील एकमेव ट्रान्सशिपमेंट हब आहे. या बंदराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बंदर आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या सर्वात जवळ आहे. त्याचबरोबर भारतीय किनारपट्टीवर मध्यवर्ती आहे.
युरोप, पर्शियन आखात, आग्नेय आशिया आणि सुदूर पूर्व यांना जोडणाऱ्या व्यस्त पूर्व-पश्चिम शिपिंग वाहिनीपासून ते फक्त 10 नॉटिकल मैल (19 किमी) अंतरावर आहे.