Zomato Name Change: झोमॅटो कंपनीनं बदललं नाव, काय आहे कारण?

Zomato New Name : देशातील दिग्गज फूड आणि किराणा कंपनी 'झोमॅटो' नं स्वत:चं नाव बदललं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Zomato To Rebrand As 'Eternal : देशातील दिग्गज फूड आणि किराणा कंपनी 'झोमॅटो' नं स्वत:चं नाव बदललं आहे. कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. झोमॅटोला आता इटर्नल (Eternal) या नावानं ओळखली जाईल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का बदललं नाव?

झोमॅटोची सीईओ दीपिंदर गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी बऱ्याच काळापासूनइटर्नल हा शब्द कंपनीसाठी वापरण्यास सुरुवात केली होती. ते म्हणाले, 'आम्ही ब्लिंकिट कंपनी खरेदी केली त्याचवेळी पॅरेंट कंपनीला झोमॅटोच्या ऐवजीइटर्नल असं म्हणू लागलो होतो. कंपनी आणि ब्रँड यांच्यात अंतर ठेवणं हा यामागील हेतू आहे. 

झोमॅटोशिवाय अन्य कोणतं प्रॉडक्ट आमच्यासाठी भविष्यात महत्त्वाचं झालं तर आम्ही सार्वजनिक पातळीवर कंपनीचं नाव बदलूनइटर्नल करण्याचं ठरवलं होतं. ब्लिंकीटच्या यशानंतर आम्ही हा निर्णय घेत आहोत. आता आम्ही झोमॅटो लिमिटेड कंपनीला (ब्रँड आणि अ‍ॅप) चं नाव बदलून ते इटर्नल करत आहोत. 

( नक्की वाचा : New Income Tax Bill : कर विधेयकात होणार 64 वर्षांनी बदल, वाचा काय असेल नव्या कायद्याचे वैशिष्ट्य )

झोमॅटोनं कंपनीचं नाव बदललं आहे. पण, फुड डिलिव्हरी कंपनीनं त्यांच्या अ‍ॅपच्या नावात कोणताही बदल केलेला नाही. इटर्नलमध्ये झोमॅटो, ब्लिंकिट,डिस्ट्रिट आणि हायपरप्युअर या चार प्रमुख व्यवसायांचा समावेश असणार आहे. हे फक्त नामांतर नाही तर एक मिशन आहे, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article