चंढीगडच्या एका मॉलमध्ये टॉय ट्रेनच्या डब्बा उलटल्याने 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार रात्री एलांटे मॉलमध्ये ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबच्या नवांशहरच्या बलाचोरहून एक कुटुंब येथे फिरायला आलं होतं. शहबाज हा मुलगा देखील त्यांच्यासोबत होता. मॉलमध्ये शहबाज टॉय ट्रेनमध्ये शेवटच्या डब्ब्यात बसला होता. मात्र ट्रेनने टर्न घेतल्याने डबा उलटला.
(नक्की वाचा - विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली 15 वर्षीय मुलगी बुडाली, पुण्याच्या इंदापुरातील घटना)
या दुर्घटनेत शहबाजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत शहबाजचा चुलत भाऊ थोडक्यात बचावला आहे, जो त्याच्यासोबतच बसला होता. अपघातानंतर शहबाजला जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा : पुण्यातील स्टिंग ऑपरेशननंतर 'तो' पब सील, 8 जणांविरोधात कारवाई; दोघे निलंबित )
ट्रेन चालवणाऱ्या व्यक्तीविरोधात मॉल व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी टॉय ट्रेन देखील जप्त केली आहे. पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु आहे. मात्र शहबाजच्या अचानक मृत्यू हळहळ व्यक्त केली जात आहे.