पिकनिकला गेलेल्या तीन तरुणींचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील मंगळुरु येथे रविवारी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तीनही तरुणांना पोहता येत नसल्याची माहिती समोर येत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगळुरूच्या उल्लाल येथील एका रिसॉर्टमध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली. तिन्ही तरुणी रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करण्यासाठी उतरल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक तरुणी स्विमिंग पूलच्या खोल पाण्यात उतरली. मात्र तिला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. तिच्यासोबत आलेल्या आणखी एका तरुणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तीही बुडू लागली. पाठोपाठ तिसरी तरुणीही आली आणि तीही स्विमिंग पूलमध्ये बुडाली.
(नक्की वाचा- पिस्तुल रोखली, ट्रिगरही दाबलं; नगरसेवक चमत्कारिकरित्या बचावला, पाहा VIDEO)
कीर्तना (21 वर्ष), निशिता (21 वर्ष) आणि पार्वती (20 वर्ष) अशी मृतांची नावे असून ते म्हैसूरचे रहिवासी होते. मुली बुडाल्या तेव्हा स्विमिंग पूलजवळच्या परिसरात कोणीही नव्हते. स्विमिंग पूलजवळ कुणी लाईफगार्ड देखील उपस्थित नव्हता. अन्यथा तरुणींचा जीव वाचवता आला असता.
(नक्की वाचा- हेलिकॉप्टरची अचानक तपासणी, सैनिकांच्या अंधारातील कवायती पाहून अधिकारी हादरले)
काही वेळानंतर रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांना स्विमिंग पूलमध्ये तिन्ही तरुणींचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणींचे मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला.