छत्तीसगडमध्ये 36 नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठं यश

Advertisement
Read Time: 2 mins

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलानं शुक्रवारी (4 ऑक्टोबर) माओवाद्यांविरोधात मोठं ऑपरेशन केलं आहे. दंतेवाडा-नारायणपूरा जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये 36 नक्षलवादी ठारे झाले आहेत. त्यापैकी 14 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले आहेत. अबूझमाड भागात ही चकमक झाली. या चकमकीनंतर नारायणपूर-दंतेवाडा भागात नक्षलवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुरक्षा दलाला त्यांच्या हेरांकडून शुक्रवारी माहिती मिळाली होती. नक्षलवादी जंगलात मोठा घातपात करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. ही माहिती मिळताच सुरक्षा दलानं घटनास्थळी धाव घेतली. जवानांना पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलानं त्याला चोख उत्तर दिलं. जवान वरचढ होत असल्याचं लक्षात येताच नक्षलवादी पळून गेले. या चकमकीमध्ये अनेक वाँटेड नक्षलवादी मारले गेले आहेत. नक्षलवाद्यांची कंपनी नंबर 6 पोलिसांनी उद्धवस्त केली आहे. 

बस्तर भागाचे पोलीस महानिरीक्षक (IG) सुंदरराज पी यांनी सांगितलं की, नारायणपूर- दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाडमधील थुलथुली गावातील जंगलात ही चकमक झाली. या चकमकीमध्ये 30 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत 14 मृतदेह मिळाली आहेत. सुरक्षा दलामध्ये जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि विशेष कार्य दलाचे (STF) जवान सहभागी होते. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबाराला चोख उत्तर दिलं. या चकमकीमध्ये सहभागी असलेले सर्व जवान सुरक्षित आहे. सध्या रात्रीची वेळ आहे. तसंच गोळीबार थांबून होत असल्यानं याबाबतची सर्व माहिती मिळण्यास वेळ लागेल, असं आयजी सुंदरराज यांनी सांगितलं. 

( नक्की वाचले : परराष्ट्रमंत्री जयशंकर करणार पाकिस्तानचा दौरा, मोदी सरकारनं 9 वर्षानंतर का घेतला निर्णय? )

मुख्यमंत्र्यांनी केला होता दंतेवाडा दौरा

नक्षलवाद्यांची कारवाई होण्यापूर्वी सकाळी मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी दंतेवाडाचा दौरा केला होता. त्यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष डॉ. रमन सिंह यांच्यासोबत 167.21 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि शिलान्यास केला होता. 

यावर्षी दंतेवाडा आणि नारायणूरसह बस्तर विभागातल्या सात जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकीमध्ये 171 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सरकारनं 2026 पर्यंत छत्तीसगडमधील बस्तर भागातून माओवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. त्यानुसार CRPF च्या 4 बटालियन बस्तरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास 4 हजार जवान बस्तरमधील वेगवेगळ्या जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहेत. त्यामध्ये झारखंडमधील 3 आणि बिहारमधील 1 

सरकार ने साल 2026 कर छत्तीसगढ़ के बस्तर में माओवादियों के खात्मे के लिए नई स्ट्रैटजी बनाई है. इसके तहत CRPF की और 4 बटालियन को बस्तर में तैनात किया जा रहा है. करीब 4 हजार जवान बस्तर के अलग-अलग जिलों में नक्सल मोर्चे पर तैनात होंगे. इनमें झारखंड से 3 और बिहार से 1 बटालियन को भेजा जा रहा है.
 

Topics mentioned in this article