PM Modi Speech: 'रक्त अन् पाणी एकत्र वाहणार नाही', सिंधू करारावरुन PM मोदींचा इशारा

79th Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: आम्ही आमच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. ते रणनीती ठरवू शकत होते, ते लक्ष्य ठरवू शकत होते, ते वेळ निवडू शकत होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

79th Independence Day Live Updates: देशभरात 79 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. अवघा देश तिरंगी रंगात रंगला आहे. 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी देशवासियांना संबोधित करताना त्यांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरुन बोलताना पाकिस्तानला कडक  शब्दात इशाराही दिला. 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

"स्वातंत्र्याचा हा उत्सव अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येक हृदय उत्साहाने भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला बळकटी देत आहे. १४० कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक घरात तिरंगा आहे - मग तो वाळवंट असो किंवा हिमालयाची शिखरे असोत किंवा समुद्रकिनारा असो किंवा लोकवस्तीचा प्रदेश असो, सर्व बाजूंनी एकच जल्लोष आहे, फक्त एकच घोषणा आहे, घोषणा आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय असलेल्या भूमीची आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या प्रकारचा नरसंहार केला, धर्म विचारून लोकांना मारण्यात आले. पतीला त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घालण्यात आल्या. संपूर्ण भारत संतापाने भरला होता. या घटनेने संपूर्ण जगालाही धक्का बसला. ऑपरेशन सिंदूर ही त्या संतापाची अभिव्यक्ती आहे. २२ तारखेनंतर, आम्ही आमच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. ते रणनीती ठरवू शकत होते, ते लक्ष्य ठरवू शकत होते, ते वेळ निवडू शकत होते आणि आमच्या सैन्याने अनेक दशकांपासून न केलेले काम केले'

79th Independence Day Live Updates: 140 कोटी भारतीय तिरंगी रंगात रंगले: PM नरेंद्र मोदी

यावेळी बोलताना त्यांनी पाकला कडक शब्दात इशारा दिला. "दहशतवाद आणि दहशतवाद्यांना बळ देणाऱ्यांना आपण आता वेगळे मानणार नाही. ते मानवतेचे शत्रू आहेत. भारताने ठरवले आहे की ते अणुधोके सहन करणार नाही. अणुबॉम्ब ब्लॅकमेलिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे, आता ब्लॅकमेलिंग सहन केले जाणार नाही. भविष्यात जर शत्रू प्रयत्न करत राहिले तर आपले सैन्य ठरवेल, सैन्याच्या परिस्थिती, सैन्याने ठरवलेला वेळ, सैन्याने ठरवलेले लक्ष्य, आम्ही ते लक्ष्य अंमलात आणू. आम्ही योग्य उत्तर देऊ," असं ते म्हणाले.

"सिंधू करार किती एकतर्फी आहे हे देशवासीयांना कळले आहे. भारतातून निघणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूंच्या जमिनीला मिळत आहे. माझ्या देशाची जमीन पाण्याशिवाय तहानलेली आहे. या करारामुळे गेल्या ७ दशकांपासून देशातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले आहे. भारताचा हक्क असलेले पाणी फक्त भारताचे आणि भारतातील शेतकऱ्यांचे आहे. यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही' अशी कठोर भूमिकाही त्यांनी मांडली. 

PM Modi Speech : "अनुबॉम्बची धमकी आता सहन करणार नाही", PM मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं