Murrah Buffalo: तब्बल 8 कोटींचा रेडा! शेतकरी मेळ्यात एकच चर्चा, वाचा श्रीमंती डाएट आणि लाखोंच्या कमाईचे रहस्य

Murrah Buffalo : या मुर्रा जातीच्या रेड्याची किंमत लाखोंमध्ये नव्हे, तर चक्क 8 कोटी रुपये इतकी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Murrah Buffalo : या रेड्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये आहे.
मुंबई:

Murrah Buffalo : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये नुकत्याच झालेल्या किसान मेळ्यामध्ये एका 'विधायक' नावाच्या रेड्याने (Reda) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मुर्रा जातीच्या रेड्याची किंमत लाखोंमध्ये नव्हे, तर चक्क 8 कोटी रुपये इतकी लावण्यात आली आहे. रेड्याची ही अवाढव्य किंमत ऐकून त्याला पाहण्यासाठी दूरदूरहून लोकांनी मेळ्यामध्ये मोठी गर्दी केली होती.  

का आहे इतकी किंमत?

हा 'विधायक' म्हणजे निवडणुकीतून निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही, तर हा मुर्रा (Murrah) वंशाचा रेडा आहे. त्याच्या विशिष्ट शरीरयष्टीमुळे (डील-डौल) आणि आकर्षक लुकमुळे जो कोणी त्याला पाहतो, तो त्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून घेतो.

पद्मश्री पुरस्कार विजेते हरियाणाचे शेतकरी नरेंद्र सिंह हे या रेड्याचे मालक आहेत. त्यांनी त्याला प्रेमाने विधायक हे नाव दिलं आहे.  मेरठमध्ये लागलेल्या किसान मेळ्यात हा रेडा पोहोचला आणि मालकाने त्याची किंमत 8 कोटी रुपये सांगितली, तेव्हा उपस्थितांना धक्का बसला. मुर्रा जातीचा रेडा इतक्या किमतीचा असू शकतो, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.

( नक्की वाचा : IAS Officer: 'पालकी में होके सवार...'! कलेक्टर मॅडमला दिला अविस्मरणीय निरोप Video पाहून डोळे पाणवतील )

स्पेशल डाएट आणि लाखोंची कमाई

'विधायक'मध्ये इतकं काय खास आहे की त्याची किंमत 8 कोटी रुपयांवर पोहोचली आहे? याबद्दल सांगताना त्याचे मालक नरेंद्र सिंह यांनी त्याच्या स्पेशल डाएटची माहिती दिली. नरेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार, त्यांचा 'विधायक' आहारात बदाम (Almond), काजू (Cashew) आणि देशी तूप (Ghee) खातो. याशिवाय तो सरसोंचे तेल (Mustard Oil) आणि दररोज 8 ते 10 लीटर दूध देखील पितो.

नरेंद्र सिंह सांगतात की, इतकी मोठी किंमत लागूनही त्यांना 'विधायक'ला विकायचे नाही. ते या रेड्याच्या वीर्याची विक्री (Semen Sale) करून दरवर्षी लाखों रुपये कमावतात.

Advertisement

सलग दोन वर्षे चॅम्पियन


नरेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार, त्यांचा 'विधायक' सलग दोन वर्षांपासून 'ओवरऑल चॅम्पियन' (Overall Champion) आहे आणि त्याला कोणीही हरवू शकले नाही. गेल्या वर्षी मेरठच्या सरदार वल्लभ भाई पटेल कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या प्रदर्शनातही हा रेडा नंबर 1 ठरला होता.

यावर्षी खासगी विद्यापीठात झालेल्या किसान मेळ्यात, 'गोलू' रेड्यानंतर आता 'विधायक' हा देशातील 'नंबर 1' मुर्रा रेडा असल्याचा दावा नरेंद्र सिंह यांनी केला आहे. या मेळ्यामध्ये गायी, म्हशी, वळू आणि घोडे यांच्याही स्पर्धा झाल्या, परंतु सर्वाधिक किंमत आणि लोकप्रियतेच्या बाबतीत 'विधायक' ओवरऑल चॅम्पियन ठरला.

Advertisement
Topics mentioned in this article