Aero India 2025: शत्रूंच्या Drone चा होणार खात्मा, अदाणी डिफेंस आणि DRDO ने तयार केली स्वदेशी यंत्रणा

नव्या युगात संरक्षण क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढला असून त्याचा वापर वाढत जाणार आहे. शत्रू राष्ट्रांच्या ड्रोनमुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ही यंत्रणा त्यासाठीच अत्यंत महत्त्वाची आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

अदाणी डिफेंस अँड एअरोस्पेस (Adani Defence & Aerospace) ने DRDO च्या सहकार्याने ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेची झलक एअरो इंडिया 2025 (Aero India 2025) मध्ये पाहायला मिळाली. ही यंत्रणा वाहनावर उभारण्यात आली असून ही यंत्रणा DRDO चे महासंचालक डॉ.बी.के.दास यांनी लाँच केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

DRDO च्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही यंत्रणा हवाई मार्गाने शत्रूकडून येणारं ड्रोनरुपी संकट निकामी करण्यासाठी आणि भारताची संरक्षण सज्जता अधिक बळकट करण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नव्या युगाच्या युद्धामध्ये टेहळणी करणे, पाळत ठेवणे आणि हल्ले करणे यासाठी ड्रोनचा वापर केला जाऊ लागला आहे. यामुळे पारंपरीक संकटांप्रमाणे या नव्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञानाने सज्ज असणे गरजेचे आहे. त्यासाठीच ही ड्रोनविरोधी यंत्रणा भारतासाठी खूप गरजेची आहे.  

Advertisement

नक्की वाचा : अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी! हेल्थकेअरमधील घोषणेमुळे गुंतवणूकदार मालामाल

अदाणी डिफेंस अँड एअरोस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी यांनी या यंत्रणेबाबत बोलताना म्हटले की, ही यंत्रणा लाँच होणे ही भारताच्या संरक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमासाठीच्या इकोसिस्टीमच्या सफलतेचे प्रमाण आहे. यासाठीची चौकट ही DRDO च्या उच्च दर्जाच्या संशोधन आणि विकासाच्या ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे (TOT)तयार करण्यात आली आहे. DRDO ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा आधार घेत अदाणी डिफेन्स अँड एअरोस्पेसने ही यंत्रणा वापरासाठी सज्ज केली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ड्रोनच्या वाढत्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी भारताची संरक्षणसिद्धता आणखी मजबूत करण्यासाठी या यंत्रणेचा फायदा होणार आहे.  ही ड्रोन विरोधी यंत्रणा वेगवान, अचूक आणि लांब पल्ल्यापर्यंत सुरक्षा कवच पुरवणारी यंत्रणा आहे. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांसाठीही ही ड्रोनविरोधी यंत्रणा ही कर्दनकाळ आहे. ही यंत्रणा ड्रोन  शत्रूंच्या ड्रोनना शोधते, तो कुठल्या प्रकारचा ड्रोन आहे हे ठरवते आणि नंतर त्याचा खात्माही करते. 

Topics mentioned in this article