अदाणी समूह बिहारमध्ये आणखी 2300 कोटींची गुंतवणूक करणार, प्रणव अदाणींची घोषणा

बिहारमध्ये स्ट्रॅटर्जिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये साठी 1000 कोटी रुपयांची देखील गुंतवणूक अदाणी समूहाद्वारे केली जाणार आहे. गतीशक्ती रेल्वे टर्मिनल्स, इनलँड कन्टेनर डेपो आणि इंडिस्ट्रियल वेअरहाऊस पार्कमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

बिहारमध्ये भविष्यातील गुंतवणुकीचा रोडमॅप अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदाणी सादर केला. बिहार बिझनेस कनेक्ट 2024 कार्यक्रमात त्यांना बिहारमध्ये येत्या काळात अदाणी समूहाद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती दिली. लॉजिस्टिक्स, गॅस डिस्ट्रिब्युशन आणि ॲग्रो लॉजिस्टिक या क्षेत्रात अदाणी समुहाद्वारे मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. यातून बिहारमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रणव अदाणी यांनी याबाबत म्हटलं की, "मी नम्रपणे सांगू इच्छितो की बिहारमध्ये गुंतवणूक करणारे आम्ही सर्वात मोठे खासगी गुंतवणूकदार आहोत. मागील वर्षी बिहार बिझनेस कनेक्टमध्ये मी शब्द दिला होता, त्यानुसार मी पुन्हा आलो आहे. मी बिहारमध्ये आम्ही काय केलं आणि भविष्यात काय गुंतवणूक करणार आहोत याचा रोडमॅप तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी येथे आलो आहे. 

(ट्रेंडिंग बातमी- Rahul Gandhi : राहुल गांधींवर होणार निलंबनाची कारवाई? भाजप खासदार आक्रमक)

लॉस्टिस्टिक, गॅस डिस्ट्रिब्युशन, अग्री लॉजिस्टिक या तीन क्षेत्रांमध्ये आम्ही आधीच 850 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यातून जवळपास 25 हजार थेट आणि अप्रत्यक्ष नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आता अतिरिक्त 2300 कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात अदाणी समूह करणार आहोत. यातूनही 25 हजार अधिकच्या नोकरीच्या संधी यातून उपलब्ध होतील. 

बिहारमध्ये स्ट्रॅटर्जिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये साठी 1000 कोटी रुपयांची देखील गुंतवणूक अदाणी समूहाद्वारे केली जाणार आहे. गतीशक्ती रेल्वे टर्मिनल्स, इनलँड कन्टेनर डेपो आणि इंडिस्ट्रियल वेअरहाऊस पार्कमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. 

Advertisement

(ट्रेंडिंग बातमी-  प्रसिद्ध Youtuber ला SEBI चा दणका; 9.50 कोटींचा दंड ठोठावत बंदीची कारवाई

बिहारमध्ये स्मार्ट मीटर सेक्टरमध्ये देखील आम्ही मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. बिहारमधील इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर सेटअपसाठी अतिरिक्त 2000 कोटींची गुंतवणूक अदाणी समूह करणार आहे. यातून 28 लाख इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर पुरवले जातील. बिहारमधील पाच शहरांमध्ये ही गुंतवणूक केली जाईल. यातून 4000 रोजगार निर्मिती होईल. 

बिहारमधील उर्जा क्षेत्रातही 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून अल्ट्रा थर्मल प्लांटची उभारणी केली जाईल. यातून सुरुवातील १२ हजार रोजगार निर्मिती होऊ शकतो. त्यानतंर जवळापस 15 हजार स्कील रोजगार यातून उपलब्ध होतील. 

Advertisement
Topics mentioned in this article