Ahmedabad Plane Crash Video: टेकऑफनंतर 10 मिनिटात विमान कोसळलं, अहमदाबाद दुर्घटनेचा भयंकर VIDEO

ahmedabad Air india plane crash Video: घटनास्थळी फायरबिग्रेड, एयर रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. दुर्घटनेतील जखमी किंवा मृत्यूंची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

जाहिरात
Read Time: 1 min

Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी परिसरात एयर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानातून 242 प्रवासी प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून घटनास्थळी फायरबिग्रेड, एयर रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. दुर्घटनेतील जखमी किंवा मृत्यूंची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका प्रवासी विमानाला अपघात झाला आहे. उड्डाण घेताच मेघनानी नगर येथे ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी धुराचे लोट पसरले असून बचावपथके दाखल झाली आहेत. दुर्घटनेनंतर सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली असून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रीही अहमदाबादला रवाना झाले आहेत.  

Advertisement


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world