गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका अपार्टमेंटला शुक्रवारी (11 एप्रिल) संध्याकाळी भीषण आग लागली. ही आग थोड्याच वेळात अपार्टमेंटच्या बहुतेक भागात पसरली. या आगमीमुळे आसमंतातमध्ये आगीचे मोठे लोळ पसरले होते. तसंच धुराचं साम्राज्य होतं. इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांनी कसाबसा स्वत:चा आणि मुलांचा जीव वाचवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहमदाबादच्या खोखर भागातील परिस्कर- 1 अपार्टमेंटमध्ये ही आग लागली. आगीची सूचना मिळताच अग्निशमन दल तातडीनं तिथं दाखलं झालं. त्यांनी मोठ्या प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या आगीमध्ये कुणाचाही मृत्यू झाला नाही.
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये या इमारतीमधील रहिशावशी स्वत:चा आणि मुलांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फोटो तुम्हाला विचलित करु शकतात. इमारतीला आग लागताच तेथील रहिवाशी जीव वाचवण्यासाठी उड्या मारु लागले. काही जणांनी खिडकीला लटकून स्वत:चा जीव वाचवला. या आगमीमुळे सर्व नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं.
सोसायटीच्या सचिवांनी सांगितलं की या आगीची सूचना तातडीनं अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाची वाहनं तातडीनं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोठ्या प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत 20 जणांना सुखरुप बचावण्यात आलं.
अग्निशनम दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, आता आग नियंत्रणात आहे. आतमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरुप वाचवण्यात आलं आहे. सुरुवातीच्या चौकशीनंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती, अशी माहिती आहे. आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात असून त्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.
( नक्की वाचा : Water Crisis : पाण्याच्या त्रासामुळे पत्नीनं घर सोडलं, पतीनं केली थेट कलेक्टरकडं तक्रार! वाचा पुढं काय झालं )
याबाबत प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार अग्निशमन दल येणाऱ्या काळात परिसराच्या सुरक्षेचं ऑडिट करण्याची शक्यता आहे.