हसत्या-खेळत्या कुटुंबाची शेवटची सेल्फी... अहमदाबाद विमान अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Ahmedabad Plane Crash News : विमानात बसल्यानंतर डॉ. प्रदीप यांनी पत्नी आणि मुलांसोबत ही सेल्फी घेतली होती. जी आता त्यांची शेवटची सेल्फी ठरली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ahmedabad Plane Crash : एकाच कुटुंबातील 5 जणांचा विमान अपघातामध्ये मृत्यू
मुंबई:

Ahmedabad Plane Crash News : या बातमीला तुम्ही जो फोटो पाहात आहा तो राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील डॉ. प्रदीप व्यास यांच्या कुटुंबाचा आहे. या फोटोमध्ये डॉ. प्रदीप व्यास, त्यांची पत्नी डॉ. कोनी व्यास आणि त्यांची तीन मुले प्रद्युत जोशी, मिराया जोशी आणि नकुल जोशी दिसत आहेत. सर्वजण लंडनला जाण्याच्या आनंदात दिसत आहेत. विमानात बसल्यानंतर डॉ. प्रदीप यांनी पत्नी आणि मुलांसोबत ही सेल्फी घेतली होती. जी आता त्यांची शेवटची सेल्फी ठरली. या अपघातात डॉ. प्रदीप व्यास यांच्या कुटुंबातील पाचही सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लंडनला स्थालांतरित होत होते कुटुंब

डॉ. कोनी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. तर त्यांचे पती डॉ. प्रदीप जोशी लंडनमध्ये डॉक्टर होते. डॉ. कोनी यांनी पतीसोबत लंडनला स्थलांतरित होण्यासाठी काही दिवसांपूर्वीच उदयपूरची नोकरी सोडली होती. उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटल व्यवस्थापनाने सांगितले की, डॉ. कोनी व्यास यांनी एक महिन्यापूर्वी येथून नोकरी सोडली होती. त्या त्यांच्या पतीसोबत राहण्यासाठी लंडनला जाणार होत्या, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव )
 

कोनी व्यास मूळच्या बांसवाडाच्या रहिवासी होत्या. कोनी व्यास यांचे आणखी एक फोटो समोर आले आहे, ज्यात त्यांचे कुटुंब घरात एकत्र दिसत आहे.

राजस्थानमधील 11 जणांचा मृत्यू

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान क्रॅश झाले, त्यात राजस्थानमधील 11 जणांच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. हे प्रवासी उदयपूर, बांसवाडा, बीकानेर आणि बालोतरा जिल्ह्यांचे रहिवासी होते. बांसवाडाच्या डॉक्टर कुटुंबाव्यतिरिक्त उदयपूरच्या एका मार्बल व्यावसायिकाच्या दोन मुलांचाही मृत्यू झालाय.  जे लंडनला फिरायला जात होते.

Advertisement

त्याचबरोबर  उदयपूरच्या एका गावातील दोन तरुणही या विमानात होते, जे लंडनमध्ये राहणाऱ्या अहमदाबादच्या एका व्यावसायिकाच्या घरी स्वयंपाकाचे काम करत होते. बिकानेरचाही एक तरुणही  विमानात प्रवास करत होता.