Ahmedabad Plane Crash : 'या' 3 अधिकाऱ्यांना तातडीनं काढा, DGCA चे Air India ला निर्देश

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर DGCA नं एअर इंडियाला कठोर निर्देश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ahmedabad Plane Crash : डीजीसीएने या अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई:

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर DGCA नं एअर इंडियाला कठोर निर्देश दिले आहेत. डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांची क्रू कार्यसूची (Crew Scheduling) संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून तात्काळ उचलबांगडी करण्याचे आदेश दिले आहेत. 20 जून रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशात, डीजीसीएने टाटा समूहाच्या मालकीच्या या एअरलाईनला या अधिकाऱ्यांविरुद्ध विनाविलंब अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्यास सांगितले आहे. डीजीसीएच्या आदेशानुसार, या तीन अधिकाऱ्यांमध्ये एअरलाईनचे एक विभागीय उपाध्यक्षांचा (Divisional Vice President) देखील समावेश आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

डीजीसीएने या अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, या कारवाईचा अहवाल 10 दिवसांच्या आत सादर करण्याचे म्हटले आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई?

चूरहा सिंग, विभागीय उपाध्यक्ष (Divisional Vice President)
पिंकी मित्तल, चीफ मॅनेजर, डीओपीएस, क्रू शेड्युलिंग
पायल अरोरा, क्रू शेड्युलिंग, प्लॅनिंग

का केली कारवाई?

या अधिकाऱ्यांवर गंभीर आणि वारंवार केलेल्या अनियमिततांचा आरोप आहे, ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:

अनधिकृत आणि नियमांचे पालन न करणारे क्रू पेअरिंग (Unauthorized and Non-compliant Crew Pairing)
अनिवार्य परवाना (Mandatory Licensing) आणि रीसेंसी नियमांचे (Recency Rules) उल्लंघन
शेड्युलिंग प्रोटोकॉल आणि देखरेखीतील पद्धतशीर चुका (Systematic Failures in Scheduling Protocols and Oversight)
या अधिकाऱ्यांना शेड्युलिंगमध्ये सुधारणा होईपर्यंत गैर-परिचालन भूमिकांमध्ये (Non-operational Roles) हस्तांतरित केले जावे आणि पुढील आदेश मिळेपर्यंत ते थेट उड्डाण सुरक्षा आणि क्रू नियमांवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही जबाबदारीवर नियुक्त केले जाणार नाहीत, असे DGCA नं स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय? )
 

उड्डाण सुरक्षेवर भर

उड्डाण सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे DGCA नं या कारवाईमध्ये स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी शेड्युलिंग प्रक्रियांमध्ये सुधारणा सुनिश्चित करावी, असे निर्देश त्यांनी एअर इंडियाला दिले आहेत. 
 

Advertisement
Topics mentioned in this article