Ahmedabad Plane Crash: 'विमानाचा अपघात होणार..', तिची भविष्यवाणी खरी ठरली, ट्वीट व्हायरल

 या दुर्घटनेनंतर आता नेटकऱ्यांनी हे ट्वीट शोधून काढत त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही अचूक  भविष्यवाणी असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी मोठी विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाच्या या विमानात 242 प्रवासी होते, ज्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. अशातच आता एका महिला ज्योतिषाचे ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने मोठ्या विमान अपघाताचे भाकीत वर्तवलं होते. 

नक्की वाचा - Air India Plane Crash: ड्रीमलाईनर्स विमानांची सेवा खंडित करावी, विमान अपघातावर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट

अहमदाबादमधील  विमान दुर्घटनेनंतर ज्योतिषी शर्मिष्ठा यांनी केलेले एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. '2025 मध्ये विमान वाहतूक क्षेत्र चांगले काम करेल, विमान अपघाताच्या बातम्या आपल्याला धक्का देऊ शकतात,' असे भाकीत दोन महिन्यांपूर्वी केले होते, . विमान वाहतूक क्षेत्रात आधीच थोडी सुधारणा सुरू झाली आहे. जेव्हा गुरु ग्रह मिथुन राशीत असेल तेव्हा मृगशिरा आणि अर्द्राच्या भागात अंदाजे वेगाने असेल, असं ट्वीट त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये केले होते.

त्याचबरोबर या दुर्घटनेच्या सात दिवस आधी पुन्हा एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये त्यांनी टाटा हैदराबादमध्ये राफेल विमानाचे फ्यूजलेज बनवणार आहेत. हा फक्त विमानचालन विस्तार आहे, येत्या दोन वर्षांत इस्रो अवकाश आणि उपग्रह अभियांत्रिकी, अंतराळ पर्यटनात जगाला आश्चर्यचकित करेल. गेल्या वर्षी नक्षत्र संक्रमणाद्वारे हे भाकीत केले होते. 2025 मध्ये विमान अपघाताबाबत केलेल्या भविष्यवाणीवर मी ठाम आहे, असं यामध्ये म्हटले होते. या दुर्घटनेनंतर आता नेटकऱ्यांनी हे ट्वीट शोधून काढत त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही अचूक  भविष्यवाणी असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.