Air India ने दिल्लीहून वॉशिंग्टन डी.सी.साठीची विमानसेवा 1 सप्टेंबर 2025 पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाच्या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे दिली जात आहेत. असे म्हटले जात आहे की Air India च्या 26 Boeing 787-8 विमानांचे अपग्रेडेशनचे काम सुरू आहे. यामुळे अनेक विमाने जास्त काळासाठी उपलब्ध होणार नाहीत. हे काम 2026 च्या अखेरपर्यंत चालेल.
याव्यतिरिक्त, पाकिस्तानची हवाई हद्द (airspace) बंद असल्याने लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये अडचणी येत आहेत. ज्या प्रवाशांनी 1 सप्टेंबर 2025 नंतरचे बुकिंग केले आहे, त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. त्यांना दोन पर्याय दिले जातील. दुसऱ्या फ्लाइटमध्ये बुकिंग करण्याचा किंवा पूर्ण पैसे परत घेण्याचा पर्याय मिळेल. त्यावरून प्रवाशांनी हा निर्णय घ्यायचा आहे असं एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे.
प्रवासी अजूनही Air India च्या इंटरलाइन भागीदार (interline partner) असलेल्या अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स यांच्याद्वारे जेएफके, न्यूयॉर्क, शिकागो किंवा सॅन फ्रान्सिस्को मार्गे वॉशिंग्टन डी.सी.ला जाऊ शकतात. एकाच तिकिटावर हे शक्य असल्याचं ही एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. Air India अजूनही उत्तर अमेरिकेतील 6 शहरांसाठी नॉन-स्टॉप फ्लाइट्स चालवत आहे. ज्यात कॅनडातील टोरोंटो आणि व्हँकुव्हर यांचा समावेश आहे.
नक्की वाचा - India - Pakistan : अरबी समुद्रात तणाव, भारत-पाकिस्तानचे नौदल आमने-सामने! इशारा जारी...
काही महिन्यापूर्वी एअर इंडियांच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात झाला होता. हे विमान लंडनला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. त्यात एक प्रवाशी सोडून सर्वांचाच मृत्यू झाला होता. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानाबाबत अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले होते. शिवाय या घटनेनंतर एअर इंडियाच्याच विमानांचे काही ठिकाणी इमर्जन्सी लँडीग ही करण्यात आले होते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता एअर इंडियाने कठोर पावलं उचलली आहेत.