गोव्याच्या कला अकादमी बांधकामाबद्दल कलाकारांचा आक्षेप, न्यायालयीन चौकशीची मागणी

पुनर्बांधणीसाठी तब्बल 50 कोटी रुपये खर्च झाल्याने यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचीही शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. 

Advertisement
Read Time: 1 min
पणजी:

अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या गोवा कला अकादमीच्या पुनर्बांधणीवर स्थानिक कलाकारांनी आक्षेप घेतला आहे. या कलाकारांनी या बांधकामत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच बांधकामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण केला आहे. गोव्याची ओळख असलेल्या कला अकादमीच्या दूरवस्थेवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.  

पुनर्बांधणीनंतर खुल्या करण्यात आलेल्या कला अकादमीच्या बांधकामाच्या दर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे.  आक्षेप घेणाऱ्यांमध्ये गोवा कला मंडळाचे संस्थापक कोषाध्यक्ष फ्रान्सिस कोएल्हो यांचाही समावेश आहे.  साधारणपणे साडेतीन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अकादमीची वास्तू खुली करण्यात आली होती. या अकादमीच्या बांधकामाबद्दल  प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.   सभागृहाच्या पुनर्बांधणीसाठी इतका वेळ का लागला असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कामासाठी झालेल्या विलंबामुळे कामाचा खर्चही वाढत गेला होता. पुनर्बांधणीसाठी तब्बल 50 कोटी रुपये खर्च झाल्याने यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचीही शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. 

Topics mentioned in this article