मुलांच्या भवितव्यासाठी रिक्षा ड्रायव्हरने विकली किडनी, पुढे जे घडलं ते...

मधुबाबूने आपली एक किडीनी विकण्याचा निर्णय घेतला.किडनी विकून खूप सारे पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती. त्यातून कर्ज फेडू शिवाय उललेल्या पैशात मुलांचे भविष्यही उज्ज्वल करू असे त्याचे नियोजन होते.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

Auto-Driver Sold Kidney To Give Kids Better Future:  मधुबाबू गरलापती हे आंध्रप्रदेशातील रहीवाशी आहेत. पेशाने ते रिक्षा चालक आहेत. ऑनलाईन कर्जाच्या जाळ्यात ते अडकले होते. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यात मुलांच्या भवीतव्याचा प्रश्न होता. अशा स्थितीत मधुबाबूने आपली एक किडीनी विकण्याचा निर्णय घेतला.किडनी विकून खूप सारे पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती. त्यातून कर्ज फेडू शिवाय उललेल्या पैशात मुलांचे भविष्यही उज्ज्वल करू असे त्याचे नियोजन होते. पण पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पनाच त्यांना नव्हती. शेवटी नको तेच मधुबाबू बरोबर घडलं आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

फेसबुकवर पाहिली जाहिरात 

मधुबाबू गरलापती हे आंध्र प्रदेशाचल्या गुंटूर इथे राहतात. ते रिक्षा चालण्याचे काम करतात. त्यांनी एक दिवस फेसबुकवर एक जाहीरात पाहीली. त्यात किडनी विकल्यास 30 लाख रुपये दिले जातील असे सांगितले होते. ही जाहीरात पाहील्यानंतर मधुबाबूच्या डोक्यात एक आयडिया आली. कर्जाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी हा त्याला एक साधा आणि सरळ मार्ग वाटला. मुलांच्या भवीष्याचाही विचार करत त्याने एक किडनी विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने विजयवाडा इथल्या बाशा नावाच्या एजंट बरोबर संपर्क साधला. किडनी दिल्यास 30 लाख रूपये देवू असे एजंटने त्याला सांगितले. त्यानंतर एका महिलेनेही मधुबाबूशी संपर्क केला. शिवाय पैसे कसे वेळेवर दिले जातील हे पटवून दिले. त्यानंतर विजयवाडाच्या एका हॉस्पिटलमध्ये मधुबाबूची किडनी काढण्यात आली. ऑपरेश आधी त्याला सांगितले गेले की तुमच्या किडनीची तात्काळ गरज आहे. शिवाय ज्याला किडनी हवी होती, त्याच्या कुटुंबा बरोबरही मधुबाबूची भेट घालून देण्यात आली. विजयवाडाला मधुबाबूचा येण्याचा खर्च करण्यात आला होता. शिवाय किडनी दिल्यानंतर पुर्ण पैसे देणार असल्याचे त्याला सांगण्यात आले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - विधानपरिषदेला 12 वा उमेदवार देण्याची गरज नव्हती, विश्वजीत कदमांची रोखठोक भूमिका

किडनी काढली पण पुढे जे झाले ते... 

त्यानंतर मधुबाबूला विश्वास पटला. आपल्याला 30 लाख मिळणार या खुषीत तो होता. त्याने आपली किडनी देण्यास तयारी दर्शवली. किडनी काढल्यानंतर आपल्याला आता पैसे मिळतील आणि सर्व काही ठिक होईल असे त्याला वाटले होते. ऑपरेशन झाल्यानंतर त्याला मात्र 50 हजार रूपयेच हातावर टेकवण्यात आले. त्यानंतर मधुबाबूला धक्काच बसला. कुठे 30 लाख आणि कुठे 50 हजार यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले. आपला गैरफायदा घेतला गेला आहे, त्यामुळे त्याने थेट पोलिस स्थानक गाठले. आपल्या बरोबर झालेली घटना त्यांनी सांगितली. या पैशातून कर्ज फेडता येईल आणि मुलांच्या भवीतव्यासाठी मदत होईल म्हणून आपण किडनी विकण्यास तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, 'हा' आहे पर्यायी मार्ग

हॉस्पिटलने हात केले वर 

या प्रकरणाची चौकशी करताना मधुबाबू आणि किडनी घेणाऱ्या रूग्णा बरोबर असलेले संबध हे खोट्या पद्धतीने दाखवले गेले होते. शिवाय डाव्या बाजूची किडनी काढण्या ऐवजी उजव्या बाजूची किडणी काढली गेली हे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी विजयवाड़ा के विजय सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर शरथ बाबू  यांनी हे सर्व केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र हे आरोप हॉस्पिटलने फेटाळून लावले आहेत. 

Advertisement