Ayushman Card: 5 लाखांपर्यंतचे उपचार आता मोफत! 'या' महागड्या आजारांचा समावेश, पाहा अर्ज करण्याची सोपी पद्धत

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ₹5 लाख पर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते
  • या योजनेतील आयुष्मान कार्ड डिजिटल प्रक्रियेद्वारे घरबसल्या किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवरून डाउनलोड करता येते
  • ₹5 लाख वार्षिक मर्यादा संपूर्ण कुटुंबासाठी असते आणि या मर्यादेत अनेक वेळा उपचार घेता येतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

देशातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (AB-PMJAY) एक वरदान ठरली आहे. सन 2018 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून मिळणाऱ्या 'आयुष्मान कार्डा'मुळे लाभार्थी देशभरातील हजारो सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दरवर्षी ₹5 लाख पर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळवू शकतात. या कार्डाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असून, पात्रताधारक अर्जदार घरबसल्या किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मधून तात्काळ कार्ड डाउनलोड करू शकतो.

नक्की वाचा - Home Remedies: पांढरे केस काळे करण्यासाठी लावा 'हे' तेल, काही दिवसातच होतील काळेभोर केस

उपचारांची मर्यादा आणि प्रमुख आजार
अनेक लोकांचा गैरसमज आहे की या कार्डावर वर्षभर अमर्याद उपचार मिळतात. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की ₹5 लाख ची मर्यादा ही संपूर्ण कुटुंबासाठी असते. जोपर्यंत ही वार्षिक मर्यादा संपत नाही, तोपर्यंत कुटुंबातील सदस्य आवश्यकतेनुसार कितीही वेळा रुग्णालयात दाखल होऊन (Hospitalization) मोफत उपचार घेऊ शकतात. आयुष्मान कार्डाद्वारे प्रामुख्याने गंभीर स्वरूपाच्या आणि रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याच्या (In-patient care) गरजेच्या आजारांवर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये OPD (सामान्य तपासणी, रक्त तपासणी, साधे एक्स-रे) यांसारख्या सेवांचा समावेश नसतो.

नक्की वाचा - Indian Citizenship: गेल्या 14 वर्षात किती भारतीयांना नागरिकत्व सोडलं? आकडा विचार करायला भाग पाडेल

कव्हर होणारे महत्त्वाचे उपचार

  • हार्ट वाल्व रिप्लेसमेंट आणि डबल वाल्व रिप्लेसमेंट
  • पेसमेकर इम्प्लांटेशन
  • प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचार
  • मणक्याशी (स्पाइन) संबंधित मोठ्या शस्त्रक्रिया
  • स्कल बेस सर्जरी (Skull Base Surgery)
  • कॅरोटिड अँजिओप्लास्टी (Carotid Angioplasty)
  • कॉर्नियल ट्रान्सप्लांट (Cornea Transplant)
  • किडनी ट्रान्सप्लांटेशन

नक्की वाचा - Wine shop: वाईन शॉप -देशी दारू दुकानदारांना दणका! या पुढे 'ही'परवानगी बंधनकारक, नाही तर...

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. यात 70 वर्षांवरील नागरिक, ESIC/PF चा लाभ न घेणारे लोक समाविष्ट आहेत. कार्ड बनवण्यासाठी 'mera.pmjay.gov.in' या अधिकृत वेबसाइटवर किंवा PMJAY ॲपवर जाऊन पात्रता तपासावी लागते आणि आधार-आधारित OTP द्वारे लॉग इन करून फोटो काढून कार्ड त्वरित डाउनलोड करता येते.