ट्रेनमध्ये चढली बँकॉकची परदेशी महिला,गर्दीत आला सर्वात घाणेरडा अनुभव, थेट रेल्वेमंत्र्यांना Video टॅग केला अन्

Foreigner Woman Train Viral Video : भारतीय रेल्वे ट्रेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ट्रेनमध्ये काही परदेशी पाहुणे टॉयलेटच्या कॅबिनजवळ उभे राहून प्रवास करत असतात. यावेळी या महिलेला ट्रेनमध्ये आलेला अनुभव तिने चक्क मोबाईल कॅमेरात कैद केला

जाहिरात
Read Time: 3 mins
Foreigner Woman Train Video
मुंबई:

Foreigner Woman Train Viral Video : भारतीय रेल्वे ट्रेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ट्रेनमध्ये काही परदेशी पाहुणे टॉयलेटच्या कॅबिनजवळ उभे राहून प्रवास करत असतात. यावेळी या महिलेला ट्रेनमध्ये आलेला अनुभव तिने चक्क मोबाईल कॅमेरात कैद केला आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. परदेशी महिला व्हिडीओत सांगते की, तिला कोच्चीहून वरकला येथे जायचं होतं. पण ट्रेनमध्ये तिला सीट मिळाली नाही. त्यामुळे टॉयलेटच्या सीटजवळ उभं राहावं लागलं. त्यामुळे त्यांना खूप दुर्गंधीचा आणि इतर समस्यांचा सामना करावा लागला. भारतात प्रवास केल्यावर कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, याचा दाखलाच या परदेशी महिलेनं व्हिडीओ शेअर करून सांगितला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हिडीओत परदेशी महिला सांगते की, "आम्ही आता याच ट्रेनमध्ये आहोत. कोच्ची ते वरकला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आम्हाला जागा मिळाली नाही. तर काय करायचं..आम्ही टॉयलेटच्या जवळच्या जागेववर अडकलो आहोत. ही ट्रेन दिल्लीहून येत होती. त्या ट्रेनमध्ये लोक, बॅग आणि घामाचा वास..सर्वकाही भरलेलं होतं. आम्ही जसं आत आलो, गरमी आणि गर्दीने आमचं स्वागत केलं. टॉयलेटमधून पाणी लीक होत होतं. सिंकमधून वेगळंच पाणी बाहेर पडत होतं. आतमध्ये गुदमरलो होतो. फक्त एकच शब्द म्हणत होतो..चिपचिप घाणेरडं..पण मजेशीर गोष्ट होतं की, थोड्या वेळातच आम्ही एकमेकांचे मित्र बनलो. लोक गरमीवर जोक मारू लागले आणि संपूर्ण माहोल सर्व्हायवल टीमसारखं बनलं. आताही मी याच ट्रेनमध्ये बसून लिहित आहे.

इथे पाहा परदेशी महिलेचा व्हायरल व्हिडीओ

आता थोडी जागा मिळाली आहे. पण वरकला पर्यंतचा प्रत्येक स्टेशन पाहत आहे. काला आम्ही एसी तिकीट घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा काऊन्टरवाले बोलले, उद्या या..जर तुम्ही भारतात फिरायला येत असाल, तर ट्रेनची तिकीट आधीच बुक करा. नाहीतर तुम्हालाही असाच घाणेरडा अनुभव येईल. तसं पाहिलं तर ट्रेनचा प्रवास खूपचा छान असतो. 2023 मध्ये मी जेव्हा आली होती, तेव्हा एव्हढी गर्दी नव्हती. कदाचित आज शनिवार असल्याने असं काही घडलं असेल. तर तुम्हीच सांगा..तुम्हाला अशा ट्रेनमधून प्रवास करणं आवडेल का?"

@Ilyas_SK_31 नावाच्या एक्स यूजरने या परदेशी पाहुण्यांचा ट्रेनचा व्हिडीओ थेट केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत यूजरने म्हटलंय, कृपया या व्हिडीओवर लक्ष द्या. बँकॉकची व्लॉगर discoverwithemma_तिच्या इन्स्टाग्रामवर भारतीय ट्रेनची रील बनवून कमवत आहे. व्हिडीओ कालच अपलोड केला आहे. ही महिला आपल्या भारतीय रेल्वे व्यवस्थेची कशाप्रकारे खिल्ली उडवत आहे ते पाहा..कृपया याप्रकरणाची चौकशी करा. अशाप्रकारच्या परदेशी कंटेन्ट क्रिएटर्सला फर्स्ट क्लास सुविधा उपलब्ध करा, हे चांगलं होईल. जेणेकरून ते चांगले व्हिडीओ बनवतील.

Advertisement

Topics mentioned in this article