Bank Holidays 2026: उद्यापासून बँकाना किती दिवस सुट्टी? पाहा RBI ची बँक हॉलिडे लिस्ट

ग्राहकांनी आपापल्या शहरातील सुट्ट्यांची स्थानिक यादी तपासूनच बँकेत जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

जर तुमचे बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम प्रलंबित असेल, तर ते आजच म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी पूर्ण करणे हिताचे ठरेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या यादीनुसार, उद्यापासून देशातील विविध राज्यांमध्ये बँकांना सलग 5 दिवस सुट्ट्या राहणार आहेत. चौथा शनिवार, रविवार आणि त्यानंतर येणारा होळीचा सण यामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होणार आहे. सलग पाच दिवस त्यामुळे अनेक बँका बंद राहाणार आहेत. कोणत्या कोणच्या दिवशी बँका आणि कुठल्या बँका बंद असणार आहे हे ही आपण जाणून घेणार आहोत.  

28 फेब्रुवारीला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. तर 1 मार्चला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे त्या दिवशी ही बँक बंद असेल. तर 2 मार्चne होलिका दहन आहे. त्याची देशातील काही शहरांमध्ये सुट्टी आहे. त्याच बरोबर  3 आणि 4 मार्च रोडी धुलीवंदन आणि होळीनिमित्त विविध राज्यांत बँकांचे कामकाज बंद राहील. तिथल्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Navi Mumbai: भामटा एक महिला अनेक! मेट्रोमोनीयल साईटवर भयंकर कांड, शरिरसंबंध, पैशांची लूट अन् बरचं काही

बँकांच्या शाखा बंद असल्या तरी, डिजिटल सेवा जसे की नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग 24 तास सुरू राहतील. तसेच एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या सुविधेत कोणताही व्यत्यय येणार नाही. 2 मार्च रोजी होलिका दहनानिमित्त लखनऊ आणि कानपूरमध्ये बँका बंद राहतील. तर 3 मार्च रोजी मुंबई, दिल्ली, जयपूर, पाटणा आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांत धुलीवंदन आणि डोल जत्रेमुळे बँकांचे कामकाज होणार नाही. 

नक्की वाचा - Nashik News: 400 कोटींच्या लुटीचं गुढ वाढलं! SIT कडून तपास CID कडे, संशयाची सुई पोलीसांकडे?

४ मार्च रोजी अहमदाबाद, चंदीगड आणि रांचीमध्ये होळीमुळे बँका पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडा. मात्र, ऑनलाइन व्यवहार सुरू असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेच्या शाखा जरी बंद असल्या तरी ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही. एटीएम (ATM) मधून पैसे काढणे आणि गुगल पे, फोन पे सारख्या यूपीआय सेवा अखंडित सुरू राहतील. ग्राहकांनी आपापल्या शहरातील सुट्ट्यांची स्थानिक यादी तपासूनच बँकेत जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे आहे सुट्ट्यांचे वेळापत्रक:

  • 1. 28 फेब्रुवारी: चौथा शनिवार (देशभर सुट्टी).
  • 2. 1 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी).
  • 3. 2 मार्च: होलिका दहन (उत्तर भारतात काही ठिकाणी सुट्टी).
  • 4. 3 मार्च: धुलीवंदन (मुंबईसह अनेक शहरांत बँका बंद).
  • 5. 4 मार्च: होळी (देशातील बहुतांश शहरांत सुट्टी).