Banke Bihari Mandir: 54 वर्षांनंतर उघडला बांके बिहारी मंदिराचा 'गुप्त खजिना'! आत सोने-चांदीचे कलश आणि...

Banke Bihari Mandir News :उत्तर प्रदेशातील मथुरा येथील सुप्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचा सुमारे 160 वर्षांचा जुना आणि मौल्यवान 'खजिना' धनत्रयोदशीच्या शुभ दिनी उघडण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Banke Bihari Mandir : तब्बल 54 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मंदिराचे हे विशेष कपाट उघडण्यात आले आहेत.
मुंबई:

Banke Bihari Mandir News :उत्तर प्रदेशातील मथुरा येथील सुप्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचा सुमारे 160 वर्षांचा जुना आणि मौल्यवान 'खजिना' धनत्रयोदशीच्या शुभ दिनी उघडण्यात आला आहे. तब्बल 54 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मंदिराचे हे विशेष कपाट (गर्भगृहाजवळील तोशखाना) शनिवारी (18 ऑक्टोबर 2025) उघडण्यात आले.

हा खजिना उघडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने 18 सप्टेंबर रोजी एक विशेष समिती तयार केली होती. प्रशासकीय अधिकारी तसेच चार नामनिर्देशित गोस्वामी यांच्या उपस्थितीत हे विशेष कपाट उघडण्यात आले.

काय सापडले खजिन्यात?

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, खजिन्यात सोने आणि चांदीच्या नाण्यांनी भरलेले कलश मिळाले आहेत. हा खजिना मंदिराच्या गर्भगृहाच्या खालील तोशखानामध्ये (Treasury) असल्याचा दावा केला जात आहे, जो बांके बिहारी यांच्या सिंहासनाखाली आहे.या खोलीत सोने-चांदीचे दागिने, सोन्याचे कलश, चांदीची नाणी, हिरे-जवाहिरात आणि नवरत्न अशा अनेक मौल्यवान वस्तू असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतिहासकारांच्या मते, 1864 मध्ये वैष्णव परंपरेनुसार मंदिराचे बांधकाम झाले, तेव्हा गर्भगृहाखाली हा तोशखाना तयार करण्यात आला होता.

( नक्की वाचा : Diwali Photo Editing: दिवाळीचे फोटो एडिट करण्यासाठी Google च्या 'Nano Banana' AI ची जादू! वाचा सर्व माहिती )
 

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी

खजाना असलेला कक्ष अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे, आत विंचू, साप किंवा विषारी वायू असण्याची शक्यता होती. त्यामुळे, खजिना उघडताना विशेष खबरदारी घेण्यात आली. खजिना शोधण्यासाठी गेलेल्या टीमने मास्क आणि सुरक्षा उपकरणे वापरली. खजिन्याच्या आसपास दोन लहान साप आढळले. त्यामुळे, वन विभाग आणि सर्पमित्रांची (स्नॅक कॅचर) टीम तिथे उपस्थित होती. विषारी वायूची शक्यता लक्षात घेऊन कक्षात कडुनिंबाची पाने ठेवण्यात आली होती. आवश्यक वैद्यकीय मदत देण्यासाठी वैद्यकीय पथकही खबरदारी म्हणून सतर्क ठेवण्यात आले होते.

Advertisement

मलबा आणि पूर्वीचा अनुभव

बांके बिहारी मंदिर समितीचे सदस्य दिनेश गोस्वामी यांनी सांगितले की, सध्या गर्भगृहाखालील दरवाजा उघडला गेला आहे, परंतु आत खूप मलबा (Debris) मिळाला आहे. त्या मलब्यातून अद्याप एकही मौल्यवान कण बाहेर काढला गेला नाही. यापूर्वी हा खजिना 54 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1971 मध्ये उघडण्यात आला होता. तेव्हा अनेक मुखांचे चांदीचे शेषनाग, सोन्याचे कलश आणि नवरत्न दिसले होते, असे सांगितले जाते.

गर्भगृहाजवळील हा दरवाजा उघडण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. सर्वोच्च न्यायालयाकडून अधिकार प्राप्त झालेल्या उच्चाधिकार व्यवस्थापन समितीच्या आदेशानंतर हा खजिना उघडला जात आहे. खजिना उघडण्याचा निर्णय 29 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह (जे समितीचे सचिव आहेत) यांनी 17 ऑक्टोबर रोजी खजिना उघडण्याचा आदेश जारी केला होता. या समितीत मंदिर व्यवस्थापनाव्यतिरिक्त सिव्हिल जज, ऑडिटर आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे

Advertisement
Topics mentioned in this article