माणसांपेक्षा प्राणी - पक्षी बरे असे म्हणत काहीजण प्राण्यांवर जीव ओवाळून टाकतात. प्राणी पाळणे हा त्यांचा आवडता छंद असतो. कधीतरी डोंगरावर किंवा जंगलात फिरायला जाणारे अनेक जण छोटे पक्षी किंवा छोटे प्राणी पकडतात आणि थेट घरी घेऊन येतात. मात्र प्राण्यांवरील क्रुरता भारतीय दंड संहिता आणि प्राणी क्रुरता प्रतबंधक कायद्यांतर्गत दंडनीय अपराध आहे. घरात पोपट, कासव,ससा पाळत असाल तर सावधान कारण तुम्हाला कारावासाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. काय आहे हा कायदा जाणून घ्या
प्राण्यांसाठी नियम काय?
प्राण्यांवरी क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० मध्ये लागू झाला आहे. प्राण्यांना मानवाकडून होणारा अनावश्यक त्रास टाळण्यासाठी हा कायदा करण्यात आलाय. या कायद्यांतर्गत प्राणी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आलीय. तर, १९७२ मध्ये वन्यजीवांची शिकार करणे, तस्करी करणे, त्यांच्या कोणत्याही शाररीक अवयवाची अवैधरित्या विक्री करणे यासाठी कठोर दंडाची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. १८६० मध्ये ४२८ आणि ४२९ हे कलम लागू करण्यात आले. यामध्ये कोणत्याही प्राण्यांना मारणे किंवा जखमी करणे यासंदर्भातील कारवाईचा उल्लेख केला आहे. त्यांना प्रवासा दरम्यान कोणताही त्रास होऊ नये या उद्देशाने १९७८ मध्ये प्राण्यांसाठी वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले.
पक्ष्यांसाठी नियम
चिमणी, कावळा आणि कबुतर हे पक्षी सोडून कोणत्याही पक्षाला पिंज-यात बंद करून ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. भारतीय वन्यजीव कायदा १९७२ नुसार हे अवैध आहे.
'हा' पक्षी पाळण्यास परवानगी
रंगबेरंगी छोटे पक्षी बाजारात पिंज-यात विक्रीसाठी दिसतात. त्यांना लव्ह बर्डस् असे म्हणतात. पक्ष्यांची ही जात ऑस्ट्रेलियातून भारतात आलीय. तिकडे हे पक्षी पाळण्यास बंदी असली तरी भारतात परवानगी आहे. मात्र एकही भारतीय पक्षी पाळण्यास परवानगी नाही अशी माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली.
अजामिनपात्र गुन्हा
या पध्दतीने जर तुम्हा प्राणी पक्षी पाळले आणि तुमच्यावर कोणी गुन्हा दाखल केला तर हा एक गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा अजामिनपात्र असल्याची माहिती अॅड. अनिरूध्द कुलकर्णी यांनी दिली. वन्य जीव संरक्षण अंतर्गत १९७२ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यात वेळेवेळी बदल देखील झाले आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास तीन ते पाच वरर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. शिवाय दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे पक्षांना किंवा प्राण्यांना पिंज-यात डांबून ठेवले असेल. त्यांचा उपयोग अंधश्रध्देसाठी करत असाल तर तसे करणे थांबवा असं कुलकर्णी यांनी सांगितलं.